सायबर सुरक्षा : आता फेसबुक मेसेंजरवरील संदेश आणि कॉलिंग पूर्णपणे गोपनीय

जगातील आघाडीची सोशल मीडिया कंपनी फेसबुकच्या काही सेवा वापरण्यात युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत आहे. यामध्ये सुरेक्षेसंबधीत अनेक समस्या बघायला मिळाल्या आहेत. फेसबुकचे फेसबुक मेसेंजर वापरतानासुद्धा गोपीनियते संदर्भात अनेक समस्यांचा सामना वापरकर्त्यांना करावा लागत होता. मात्र यामधून वापरकर्त्यांची सुटका होणार आहे.

आता आपल्या फेसबुक मेसेंजरवरून पाठविण्यात येणारे संदेश अथवा व्हाईस कॉलिंग, व्हिडिओ काॉलिंग पुर्णपणे गोपनीय असणार आहे. फेसबुकने आपल्या मेसेंजर अ‍ॅपमध्ये एंड-टू-एंड एनक्रिप्शनची सुरुवात केली आहे. ज्यामध्ये या मेसेंजरमधून होणारे संभाषन आता पाठवणारा आणि प्राप्तकरणाराच पाहू शकेल. मध्ये याला हॅकर हॅक करू शकणार नाही.

हे सुरक्षा फीचर सुरू होण्याबाबात माहिती फेसबुकने आपल्या एका ब्लॉगमध्ये दिली आहे. हे फीचर काही देशांमध्ये सुरु होणार आहे. त्यानंतर सर्व देशांमध्ये सुरु करण्याची फेसबुकची योजना आहे.

व्हाट्सअ‍ॅप वर आधीपासूनच एंड-टू-एंड एनक्रिप्शनचा वापर केला जात आहे. आता फेसबुक मेसेंजरवरही ही सुविधा देण्यात येणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.