मुंबई – बाॅलिवूड अभिनेत्री कंगना राणावत सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या वादग्रस्त ट्विटमुळे जोरदार चर्चेत आहे. अशातच कंगनाने आणखी एक ट्विट करत थेट हॉलिवूड सुपरस्टार ‘टॉम क्रुज’वर निशाणा साधला आहे.
कंगनाने आपल्या ट्विट मध्ये म्हटलं आहे कि, “सुप्रसिद्ध अॅक्शन दिग्दर्शक ज्यांनी हॉलिवूडच्या अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे त्यांच म्हणणे आहे की ‘मी टॉम क्रुजपेक्षा चांगले अॅक्शन स्टंट करू शकते.’ या आशयाचे ट्विट तिने केलं आहे. कंगनाने आपली तुलना टॉम क्रूज सोबत केल्यामुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले आहे.
Ha ha ha bahut pareshaan hain librus, yeh Dekho renowned action director of Brave heart and many legendary Hollywood action films said I am better than Tom Cruise when it comes to action …
Hahahahaha bechare librus aur tadpo. https://t.co/pVYxZhYUOM— Kangana Ranaut (@KanganaTeam) February 9, 2021
दरम्यान, दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या हिंसाचारावर कंगनाने टीका केली होती. आंदोलक शेतकऱ्यांना जेलमध्ये टाका आणि त्यांची संपत्ती जप्त करा असे ती म्हणाली होती. एवढेच नाही तर एका ट्विटमध्ये कंगनाने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आतंकवादी देखील म्हटले होते. तिच्या याच ट्विटविरोधात आता तक्रार देण्यात आली असून यामुळे तीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.