Bigg Boss Marathi With Riteish Deshmukh| ‘बिग बॉस मराठी’ हा लोकप्रिय शो लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वीच याबाबत घोषणा करण्यात आली होती. ‘कलर्स मराठी’ने ‘बिग बॉस मराठी’ची पहिली झलक चाहत्यांबरोबर शेअर केली होती. यावेळी ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन महेश मांजरेकर नाही तर अभिनेता रितेश देशमुख करणार असल्याचे समोर आले होते. ज्यामुळे बिग बॉसच्या पाचव्या सीझनबाबत चाहत्यांची उत्सुकता अधिक वाढली.
रितेश देशमुखवर त्याच्या लाखो चाहत्यांसह ‘बिग बॉस मराठी’च्या प्रेक्षकांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. ‘कलर्स वाहिनी’ने नुकताच ‘बिग बॉस मराठी’चा दुसरा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये रितेशसह अभिनेता निखिल रत्नपारखीची झलक पाहायला मिळत आहे. आता नव्या भागात कोण झळकणार? नवीन शो केव्हा सुरु होणार? याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. Bigg Boss Marathi With Riteish Deshmukh|
View this post on Instagram
प्रोमोमध्ये दिसते की, ‘बिग बॉस मराठी’च्या घरात यापूर्वी झालेले वाद पाहून निखिल रितेशला सांगतो “सर, ही आहे बिग बॉसची दुनिया…हे सगळ्या सीझनमध्ये असंच असतं, तुम्ही पाहून घ्या पहिल्यांदाच होस्ट करताय” यावर रितेश म्हणतो, “यापुढे हे असंच नसणार… आता मी आलोय कल्ला तर होणारचं तोही माझ्या स्टाइलने”.
बिग बॉस’मध्ये आतापर्यंत एका वेगळ्या पद्धतीचे खेळ, नियम आणि टास्क होते. पण आता रितेशच्या येण्याने नवा धमाका यात पाहायला मिळणार असल्याचे प्रोमोवरुन स्पष्ट होत आहे. यावरून यंदा ‘बिग बॉस मराठी’मध्ये कोणत्या गोष्टी नवीन पाहायला मिळणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
हेही वाचा:
समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात ! दोन कारचा चुराडा ; ६ जणांचा जागीच मृत्यू तर ४ जण गंभीर जखमी