“पानिपत’मध्ये आता झीनत आमानही

आशुतोष गोवारीकरने जेंव्हापासून “पानिपत’ची घोषणा केली आहे, तेंव्हापासूनच त्याबाबतची उत्सुकता वाढायला लागली आहे. ऐतिहासिक विषयाबरोबरच यामध्ये असलेली तगडी स्टारकास्ट हे देखील याचे प्रमुख आकर्षण आहे. या स्टारकास्टमध्ये आता झीनत अमान यांच्या नावाचीही भर पडली आहे. “पानिपत’मध्ये झीनत अमान या सकिना बेगमचा रोल साकारणार आहेत.

आशुतोष गोवारीकर आणि झीनत यांनी पूर्वी एकाच सिनेमात कलाकार म्हणून एकत्र कामही केले आहे. 1989 साली अनंत बालानीच्या “गवाही’मध्ये हे दोघे एकत्र होते. “पानिपत’मध्ये अर्जुन कपूर, क्रिती सेनन आणि संजय दत्त हे लीड रोलमध्ये असणार आहेत. अर्जुन कपूरला प्रथमच ऐतिहासिक सिनेमातील ऍक्‍शनपॅक्‍ड रोल मिळाला आहे आणि तो या रोलसाठी कसून मेहनतही घेतो आहे.

त्याने घोडेस्वारी करणे देखील शिकून घेतले आहे. “संदीप और पिंकी फरार’ मध्ये परिणिती चोप्राबरोबरही तो दिसणार आहे. “पानिपत’मध्ये तो सदाशिव राव भाऊंचा रोल साकारतो आहे. 1761 साली अहमद शाह अब्दाली आणि मराठ्यांमध्ये पानिपत येथे झालेल्या या ऐतिहासिक युद्धावर बेतलेला हा सिनेमा याच वर्षी 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.