मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागानं मद्य खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी ई-टोकन सुविधा उपलब्ध केली आहे. वाईन शॉप्समध्ये होणारी गर्दी आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ही उपायोजना करण्यात आली आहे.
ही सुविधा http://www.mahaexcise.com या संकेत स्थळावर सुरु करण्यात आली आहे. यासाठी ई-टोकन सुविधा www.mahaexcise.com या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. मद्य खरेदीसाठी या संकेत स्थळावर रजिस्ट्रेशन करुन ई-टोकन घ्यावे. यासाठी संकेत स्थळावर ग्राहकाने मोबाईल नंबर आणि नाव रजिस्टर करायचे . त्यानंतर आपला जिल्हा आणि पिन कोड नमूद करायचा आहे. त्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करणं आवश्यक आहे. यानंतर ग्राहकास आपल्या नजीकच्या मद्यविक्री दुकानांची यादी मिळेल. त्यापैकी एका दुकानाची निवड करायची आहे. त्यानंतर विशिष्ट तारीख आणि वेळेची निवड ग्राहकास करता येईल. आवश्यक माहिती नमूद केल्यानंतर ग्राहकास ई-टोकन मिळणार आहे. सदर टोकन आधारे ग्राहक आपल्या सोयीच्या वेळी सबंधीत दुकानात जाऊन रांगेची गर्दी टाळून मद्य खरेदी करु शकतात.