बॉलीवूडमधील प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी कॉंग्रेसचा झेंडा हाती घेतल्या नंतर कॉंग्रेसकडून उर्मिला मातोंडकरला उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने उर्मिला मातोंडकर अनेकांच्या भेटीगाठी करत आहेत. यातच उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली असून दोघांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. या भेटीबाबत उर्मिला मातोंडकर यांनी शरद पवार यांचे ट्विटद्वारे आभार व्यक्त केले आहे की, ”गुरुतुल्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे माननीय पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभल्यावर आता हा प्रवास विजयाकडेच जाईल. माझ्या या लढ्याला बळकटी दिल्याबद्दल त्यांचे अनेक अनेक आभार ”
गुरुतुल्य आणि उत्तुंग व्यक्तिमत्व असणारे माननीय पवार साहेब यांचे मार्गदर्शन लाभल्यावर आता हा प्रवास विजयाकडेच जाईल. माझ्या या लढ्याला बळकटी दिल्याबद्दल त्यांचे अनेक अनेक आभार ? #AapliMumbaichiMulagi pic.twitter.com/j8etJ9CaUG
— Urmila Matondkar (@OfficialUrmila) April 11, 2019