नोव्हाक जोकोविचचे आव्हान संपुष्टात

अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा
न्युयॉर्क: अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेचा गतविजेता आणि अग्रमानांकित खेळाडू नोव्हाक जोकोविचचे आव्हान उपान्त्यपूर्व फेरी पुर्वीच संपुष्टात आले. रविवारी झालेल्या सामन्यात स्टॅन वावारिंकाच्या विरोधातील तिसऱ्या गेममध्ये दुखापतीमुळे त्याने सामना सोडल्याने त्याचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तर, डॅनिएल मेदवेदने उपान्त्यपुर्व फेरीत आपले स्थान निश्‍चित केले आहे.

यावेळी पुरुष गटातील पहिल्या सामन्यात अग्रमानांइकित नोव्हाक जोकोविचसमोर 23व्या मानांकित स्टॅन वावारिंकाचे आव्हान होते. स्टॅनने या पुर्विच्या सामन्यात जॉन इस्नरचा पराभव करत धक्‍कादायक निकालाची नोंद केली होती. याही सामन्यात स्टॅनने पहिल्या सर्व्ह पासूनच जोकोविचवर वर्चस्व गाजवायला सुरूवात केली. त्यामुळे अग्रमानांकित जोकोविच सामन्यात दडपणात वावरताना दिसत होता. त्यातच त्याचा उजवा खांदा सामन्याच्या सुरूवाती पासूनच दुखत असल्याने त्याला सामन्यात खेळताना अडचणिंचा सामना करावा लागला.

स्टॅनने यापुर्वी 2016साली जोकोविचला अमेरिकन खुली टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभवाची धुळ चारत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्याच जोमाने स्टॅन या सामन्यात खेळताना दिसून आला. यावेळी त्याने पहिला सेट 6-4 अशा फरकाने एकतर्फी आपल्या नावे केल्याने जोकोविच आणखीनच दडपणात आला. मात्र, दुसऱ्या सेटमध्ये जोकोविचने आपल्या खेळात सुधारणा करत पुनरागमनाचा प्रयत्न करत स्टॅनला चांगलेच झुंजवले. त्यामुळे पहिल्यांदा एकतर्फी वातनारा सामना अचानक रोमांचक स्थितीत आला. मात्र, स्टॅनने ऐनवेळी पुनरागमन करत सामन्यातील दुसरा सेट 7-5 अशा फरकाने आपल्या नावे केला.

यानंतर तिसऱ्या सेटच्या सुरूवातीपासूनच जोकोविचचा खांदा पुन्हा दुखायला लागल्याने खेळात सारखा सारखा अडथळा येत होता. मात्र, तीन गेम झाल्यानंतर जोकोविचने दुखापत जास्त झाल्यामुळे सामना सोडण्याचे जाहिर केल्याने स्टॅनने तिसरा सेट 2-1 अशा फरकाने आपल्या नावे करत उपान्त्यपुर्व फेरीत आपले स्थान निश्‍चित केले. तर, दुसऱ्या सामन्यात पाचवे मानांकन असणाऱ्या डॅनिएल मेदवेदने बिगर मानांकित डॉमनिक कोईपफरचा 3-6, 6-3, 6-2, 7-6 (7-2) असा पराभव करत उपान्त्यपुर्व आपले फेरीत स्थान निश्‍चीत केले आहे. उपान्त्यपुर्व फेरीत त्याचा सामना स्टॅन वावारिंकाशी होणार असून यापुर्वी हे दोघे दहा वेळा एकमेकाम्समोर उभे ठाकले असून मेदवेदला केवळ एकदाच स्टॅन विरोधात विजय मिळवता आला आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)