नदालचा पराभव करत जोकोविचने पटकावले विजेतेपद

ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा

सिडनी  – ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोव्हिचने राफेल नदालचा एकतर्फी पराभव करत पुरुष एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. जोकोव्हिचने नदालचा 6-3, 6-2, 6-3 अशा फरकाने सहज पराभव केला. या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांना मागे टाकत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच जोकोव्हिचने सामन्यावर वर्चस्व ठेवले होते. पण दुसरीकडे नदालकडून अपेक्षित खेळ पाहायला मिळाला नाही. तिन्ही सेट्‌समध्ये जोकोव्हिचने दमदार खेळ करत नदालला निष्प्रभ केले होते. जोकोव्हिचने आक्रमक खेळ करत नदालला डोके वर काढू दिले नाही. जोकोव्हिचने सामन्यावर पुर्णपणे वर्चस्व गाजवले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नदालचा सरळ तीन सेटमध्ये पराभव करत सामना 3-0 च्या फरकाने जिंकला. तिन्ही सेटमध्ये नदालला एकदाही पुनरागमनाची संधी दिली नाही. पहिला सेट 6-3 च्या फरकाने जिंकत जोकोव्हिचने वेगवाग सुरूवात केली. त्यानंतर संपूर्ण सामन्याभर नदालला एकदी संधी न देता सामन्यावर नाव कोरले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)