लंडन – एटीपी सिरीज टेनिस स्पर्धेत डॅनियल मेदवेदेव याने स्पर्धेतील सर्वात धक्कादायक निकाल नोंदवताना सर्बियाच्या अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोवीच याचा पराभव केला. या विजयाच्या जोरावर मेदवेदेवने स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली आहे.
करोनाचा धोका कमी झाल्यानंतर सुरु झालेल्या टेनिस स्पर्धांतील यंदाच्या मोसमातील दुसऱ्या स्पर्धेत मेदवेदेवने आपल्या कामगिरीत कमालीचे सातत्य राखले आहे. त्याने उपांत्यपूर्व लढतीत जोकोवीचवर 6-3, 6-3 असा सरळ दोन सेटमध्ये झालेल्या लढतीत पराभव केला.