लंडन – सर्बियाचा अव्वल टेनिसपटू नोवाक जोकोविच, रॉजर फेडरर, राफेल नदाल तसेच फ्रान्सेस टियाफोए यांना यंदाचा एटीपीचा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.
जोकोविचने सलग सहाव्यांदा वर्षअखेर अव्वल स्थान पटकावण्याचा पराक्रम केला. त्याने यंदा ऑस्ट्रेलियन ग्रॅंडस्लॅम स्पर्धेच्या आठव्या जेतेपदासह चार विजेतेपदे पटकावली.
अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद मिळवणारे मेट पॅव्हीच आणि ब्रूनो सोरेस ही दुहेरीतील अव्वल जोडी ठरली. फेडररने एकेरीतील चाहत्यांच्या पसंतीचा पुरस्कार सलग 18व्या वर्षी पटकावला.
नदालला स्टीफन एडबर्ग खिलाडीवृत्ती पुरस्काराने सलग तिसऱ्या वर्षी सन्मानित करण्यात आले. रशियाचा आंद्रेय रुबलेव्ह हा सर्वोत्तम प्रगतीकारक टेनिसपटू ठरला.