पॅरिस : फ्रान्सची राजधानी पॅरिसमधलं ऐतिहासिक नोत्रे दाम कॅथेड्रलची दारं आज पुन्हा उघडणार आहेत. दोन शतकांच्या कालावधीत बांधलेल्या आणि साडेपाच वर्षांपूर्वी लागलेल्या भयंकर आगीत जवळपास भस्मसात झालेल्या या ८६१ वर्षं जुन्या वास्तूची पुनर्बांधणी फक्त पाच वर्षांत करणं हे अद्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांचे मोठे यश मानले जाते आहे.
नॉत्रे दाम कॅथेड्रलच्या आज संध्याकाळी होणाऱ्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात जगभरातल्या विविध देशांचे नेते आणि भाविक यांच्यासह सुमारे दीड हजार लोक उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन, नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे प्रिन्स विल्यम यांचा यात समावेश आहे.
दिनांक १५ एप्रिल २०१९ च्या संध्याकाळी,या कॅथेड्रलच्या छताला आग लागली होती. त्यामुळे छताचा बराचसा भाग कोसळला होता. पण बेल टॉवर आणि दर्शनी भाग धरून राहिला होता. नोत्रे दाम हे पॅरिसमधील हे फ्रेंच राजधानीतील र्वात प्रिय आणि भेट दिलेल्या स्मारकांपैकी एक आहे.