विवेक ओबेरॉयच्या पत्नीला नोटीस

सॅंडलवूड ड्रग्ज प्रकरण

मुंबई  – सॅंडलवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेता विवेक ओबेरॉयची पत्नी प्रियांका अल्वा यांना त्यांचा भाऊ आदित्य अल्वा फरार झाल्यामुळे नोटीस बजावली आहे. काल या प्रकरणात बंगळुरू पोलिसांच्या गुन्हे शाखेने विवेकच्या घरावर त्याला शोधण्यासाठी छापाही टाकला होता.

आदित्यवर चार सप्टेंबरला गुन्हा नोंदवण्यात आला असून तेव्हापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे.

या प्रकरणात त्याला शोधण्यासाठी लूकआऊट नोटीस तीन आठवड्यांपूर्वी देण्यात आली होती. गुरुवारी घातलेल्या छाप्यात तो विवेक ओबेरॉय यांच्या निवासस्थानी आढळला नव्हता.

आदित्य अल्वा हा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जीवराज अल्वा यांचा पुत्र असून त्याचे नाव सॅंडलवूड ड्रग्ज प्रकरणात 11 आरोपींमध्ये आहे. या प्रकरणात रागिणी द्विवेदी आणि संजना गलराणी यांच्यासह अनेक दिग्गजांना गुन्हे शाखेने अटक केली आहे. यापूर्वी गुन्हे शाखेने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यात दर शनिवारी कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गजांसाठी पार्टी आयोजित करत असे, त्या फार्महाऊसवरही छापा टाकला होता.

ओबेरॉय यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यानंतर ओबेरॉय कुटुंबांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.