मुंबई – राणे कुटुंबियांनी आपल्या जुहु येथील बंगल्यात केलेल्या बेकायदा बांधकामाबद्दल मुंबई महापालिकेने त्यांना पुन्हा एकदा नोटीस बजाऊन हे बांधकाम पाडून टाकण्याची सुचना केली आहे. भाजप नेते राणे यांच्या पत्नी आणि मुलाला 16 मार्च रोजी बजावलेल्या नोटीसमध्ये,महापालिकेने म्हटले आहे की, बंगल्यात अनाधिकृतपणे केलेले बांधकाम स्वताहून पाडून टाकले नाही तर महापालिका हे बांधकाम पाडेल आणि त्याचा खर्च राणे कुटुंबियांकडून वसुल केला जाईल.
राणे यांच्या आधिश बंगल्याच्या बांधकामात सीआरझेड नियमांचेही उल्लंघन झाल्याचा महापालिकेचा आरोप आहे. राणे यांच्या कुटुंबियांना या प्रकरणात या आधीही अनेक नोटीसा जारी करण्यात आल्या आहेत. तथापि राणे यांनी हा दावा फेटाळून लावला असून आपल्यावरील नोटीस राजकीय द्वेष भावनेतून जारी केली गेली आहे असे त्यांचे म्हणणे आहे.