Notice to Nitin Gadkari and Others । भारतीय जनता पक्ष (भाजप) आपल्या काही खासदारांना नोटीस पाठवण्याच्या तयारीत आहे. यामध्ये काही मोठ्या नावांचाही समावेश आहे. काल ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक मांडताना सभागृहात उपस्थित नसलेल्या लोकसभा सदस्यांना भाजप नोटीस पाठवेल. या बड्या नेत्यांमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि गिरीराज सिंह यांसारख्या नावांचाही समावेश आहे.
भाजपने लोकसभा सदस्यांना यापूर्वीच जारी केलेल्या तीन ओळींचा व्हिप न पाळल्याबद्दल या खासदारांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे संगणयत येत आहे. या व्हीपमध्ये पक्षाच्या सर्व खासदारांना लोकसभेत विधेयके मांडताना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
गैरहजेरीचे कारण अस्पष्ट Notice to Nitin Gadkari and Others ।
एका वृत्तसंस्थेने याविषयी माहिती देताना, ‘जे खासदार सभागृहात उपस्थित नव्हते त्यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे किंवा अन्य काही कारणांमुळे त्यांच्या अनुपस्थितीची माहिती पक्षाला दिली होती की नाही हे अजून स्पष्ट झालेले नाही.
मंगळवारी विधेयक मांडण्यात आले Notice to Nitin Gadkari and Others ।
केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काल लोकसभेत ‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक मांडले होते. यावेळी विरोधकांनी चांगलाच गोंधळ घातला होता. यासंदर्भात नंतर मतदान झाले. यामध्ये 269 सदस्यांनी विधेयक मांडण्याच्या बाजूने तर 196 सदस्यांनी विरोधात मतदान केले. आता हे विधेयक पुढील चर्चेसाठी संयुक्त संसदीय समितीकडे (जेपीसी) पाठवले जाईल.
मंगळवारी लोकसभेत ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक सादर करण्यात आले तेव्हा केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह, नितीन गडकरी, ज्योतिरादित्य सिंधिया आणि सीआर पाटील यांच्यासह सुमारे 20 भाजप खासदार अनुपस्थित होते. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, शंतनू ठाकूर, जगदंबिका पाल, बीवाय राघवेंद्र, विजय बघेल, उदयराजे भोसले, जगन्नाथ सरकार, जयंत कुमार रॉय, व्ही सोमन्ना, चिंतामणी महाराज हे विधेयक सादर करताना सभागृहात उपस्थित नव्हते.