चंदीगड – केंद्र सरकारच्या सुचनेनुसार आता बॅंकांनीहीं शेतकऱ्यांच्या संघटनांना नोटीसा जारी करण्याची प्रक्रिया सुरू केली असून या शेतकऱ्यांना त्यांच्या विदेशातील मित्र व नातेवाईकांकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीसंबंधात त्यांच्याकडे विचारणा केली जात आहे.
ज्या संघटनांना विदेशातून आर्थिक मदत घ्यायची आहे अशा संघटनांनी विदेशी योगदान नियंत्रण कायदा म्हणजेच एफसीआरए रजिस्ट्रेशन करणे बंधनकारक आहे. ते रजिस्ट्रेशन न करताच विदेशातून काही निधी जमा केल्याबद्दल भारतीय किसान युनियनच्या एकता उघरन गटाला पंजाब आणि िंसंध बॅंकेने नोटीस जारी केली आहे.
या संघटनेचे सुखदेव सिंग यांनी सांगितले की आम्हाला बाहेरील देशातून जी मदत आली आहे त्या संबंधात आम्ही हे रजिस्ट्रेशन सादर करावे अन्यथा हा निधी परत पाठवला जाईल अशी सुचना करणारा इमेल आम्हाला बॅंकेकडून आला आहे. विदेश चलन विभागाकडून हा निधी आल्याची माहिती मला बॅंकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे असे ते म्हणाले.
या संबंधात आम्ही आता आमच्या चार्टर्ड अकाऊंटंटचा सल्ला घेऊन सदर इमेल नोटीशीला उत्तर देऊ असे ते म्हणाले. ते म्हणाले की अनिवासी पंजाबी नागरीक सामाजिक कामासाठी त्यांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून आम्हाला मदत करीत असतात असेही त्यांनी सांगितले.