नवी दिल्ली – दिल्लीतील सर्व सातही लोकसभा मतदार संघांमध्ये उद्या निवडणुकांच्या सातव्या टप्प्यामध्ये मतदान होणार असून दिल्लीत निवडणूक प्रचार देखील आता थंडावला आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार प्रचाराची अधिकृत मुदत संपली असताना देखील नमो टीव्ही या भाजपच्या प्रचार वाहिनीवर पक्षाचा प्रचार करणारे कार्यक्रम दाखवले गेल्याबद्दल दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नमो टीव्हीला नोटीस जारी केली आहे.
कोणत्याही वाहिनीवर अथवा सोशल मिडीयावरही निवडणूक संबंधीत प्रचार करता येणार नाही असे दिल्लीचे सीईओ रणबीरसिंग यांनी म्हटले आहे. या प्रचार बंदीच्या काळातही नमो टिव्हीवर भाजपचा प्रचार सुरू राहिल्याने त्यांनी भाजपला आचार संहिता भंगाची नोटीस जारी केली आहे. प्रसारणाचे सर्टिफिकेट घेतल्याशिवाय या टीव्हीवरून कोणताही प्रचार केला जाऊ नये अशी सुचनाही त्यांनी केली आहे.