कऱ्हाड – माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. गेल्या दहा वर्षातील संपत्तीचे विवरण द्यावे अशी नोटीस बजावली असून त्याबाबत आज चव्हाण यांनी माहिती दिली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, सत्तेचा वापर कसा आणि कोणासाठी करायचा याची भाजपने अत्यंत चांगल्या पद्धतीने व्यूहरचना केली आहे. काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांना नोटीस बजावण्यात आली होती. आता मलाही नोटीस आली आहे. प्रत्यक्ष हजर राहण्याचेही नोटीसीत नमूद करण्यात आलेले आहे.