भाजप नेते गिरीराज सिंह यांना निवडणूक आयोगाकडून नोटीस

बेगुसराय – जातीयवादी विधाने केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीराज सिंह यांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे. वंदे मातरम् कोण म्हणत नाही, मातृभूमीची पूजा करू शकत नाही म्हणत गिरीराज सिंह यांनी, माझे वडील आणि आजोबा गंगा नदीच्या काठावर मरण पावले पण त्यांना कबरची गरज पडली नसल्याचे सांगत, परंतु तुम्हाला तीन हात लांबीची जमीन आवश्यक आहे. असे करू नका, देश तुम्हाला कधीच क्षमा करणार नाही असे विधान त्यांनी केले होते.

२४ एप्रिल रोजी बेगुसराय येथील एका कॉलेजमध्ये प्रचारसभेत बोलत असताना गिरीराज सिंह यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने निवडून आयोगाने त्यांना नोटीस बजावली आहे.

दरम्यान, कन्हैया कुमार भारतीय कम्युनिस्ट पार्टीचा (भाकपा) उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार आहे. बिहारमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या बेगूसराय मतदारसंघात गिरिराज सिंह विरुद्ध जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेचा नेता कन्हैय्या कुमार असा सामना रंगणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.