Delhi Exit Poll | दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी एकूण 70 जागांसाठी 5 फेब्रुवारीला मतदान पार पडले. या निवडणुकीत एकूण 699 उमेदवारांनी आपलं नशीब आजमावलं होतं. यानंतर आता येत्या शनिवारी 8 फेब्रुवारीला दिल्ली विधानसभेचा निकाल समोर येणार आहे. त्यापूर्वी विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेमधून एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, दिल्लीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. दिल्लीत सत्तापालट होण्याचा अंदाज आहे. पण काँग्रेस खाते उघडण्यात तरी यशस्वी होणार का? याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. तर गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत एकहाती वर्चस्व विजय मिळवणारा आम आदमी पक्ष यावेळी पिछाडीवर पडण्याची शक्यता आहे.
दिल्लीत यंदाही देशातील सर्वात जुन्या पक्षाला दिल्लीच्या सत्तेत स्थान मिळण्याची शक्यता दिसत नाही. २०१५ आणि २०२०च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष शून्यावर राहिला आहे आणि यावेळीही तसेच चित्र दिसण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी काँग्रेस दोन ते तीन जागा मिळवण्याची शक्यता आहे.
काँग्रेस यंदाही शून्यावर राहणार ?
दिल्लीत आम आदमी पक्षाचे सत्ता स्थापन करणार असल्याचे भाकीत करणाऱ्या सर्वेक्षण संस्थापैकी काही एजन्सीने काँग्रेसला शून्यावर आणले आहे. तर इतर संस्थांनी देखील काँग्रेसची आकडेवारी शून्यापासूनच सुरू केली आहे. माइंड ब्रिकच्या अंदाजानुसार, काँग्रेस पक्ष एक जागा जिंकून आपले खाते देखील उघडू शकतो. पी-मार्कच्या एक्झिट पोलमध्ये 0- 1, जेव्हीसी एक्झिट पोलमध्ये 0-2 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर व्हिप्साइड आणि माइंड ब्रिंक यांनी दिल्लीत ‘आप’साठी स्पष्ट बहुमताचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. Delhi Exit Poll |
2013 मध्ये पहिल्यांदा ‘आप’ने सरकार स्थापन केले
दिल्लीत 28 डिसेंबर 2013 मध्ये आम आदमी पक्षाने (आप) कॉंग्रेसच्या मदतीने दिल्लीत पहिल्यांदाच सरकार स्थापन केली. या निवडणुकीत 8 जागा जिंकणार्या कॉंग्रेसने भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम आदमी पक्षाला बिनशर्त पाठिंबा देऊन आपले सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा केला.
सलग दोन निवडणुकीत कॉंग्रेसलअ खातेही उघडता आले नाही
तर 2015 च्या विधानसभा निवडणुकीत आपने 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवला होता, तर भाजपाला 3 जागा मिळाली होती आणि कॉंग्रेसचे खातेही उघडले नाही. यानंतर, 2020 च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने 70 पैकी 62 जिंकल्या आणि भाजपाला 8 जागांवर समाधानी मानावे लागले. त्याच वेळी, कॉंग्रेसला सलग दुसर्यांदा खातेही उघडता आले नाही. समोर आलेले अंदाज खरे ठरले तर, दिल्लीत सलग तिसऱ्यांदा काँग्रेस आपले खाते उघडू शकणार नाही. परंतु याबाबत आता स्पष्ट चित्र 8 फेब्रुवारीला स्पष्ट होईल. Delhi Exit Poll |
हेही वाचा:
“संपूर्ण देशात मांसाहारावर बंदी घालायला पाहिजे…”; अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचे मोठे वक्तव्य