फिट दिसण्यासाठी काहीही केले नाही

एन्टरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये काय बातम्या पसरतील काही सांगता येणार नाही. काही वेळेस काही विचित्र बातम्यांमध्ये तथ्य असते. मात्र, फारच कमी वेळेस अतिशयोक्तीपूर्ण बातम्या या निव्वळ अफवा असल्याचे लक्षात येते. यावर्षी मे महिन्यात झालेल्या “मेट गाला’ इव्हेंटमध्ये आपला आवडता पोषाख परिधान करता यावा म्हणून किम कार्दशियाने चक्क आपल्या बरगड्याच काढून टाकल्या असल्याची अफवा पसरली होती. अर्थात किमचा फिटनेस बघता कोणालही तशी शंका येणे स्वाभाविकच आहे. पण म्हणून ड्रेस फिट बसावा म्हणून चक्क बरगड्या काढून टाकण्याचा विचार कोणी करेल, अशी शक्‍यता नाही.

स्वतः किमने ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. “मेट गाला’मध्ये तिने बॉडी हगिंग थिअरी मग्लर मिनी ड्रेस घातला होता. अलीकडेच दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये तिने या अफवेचा समाचार घेतला. पहिली गोष्ट म्हणजे आपण बरगड्या वगैरे काढून टाकल्या नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे हा ड्रेस परिधान करणे हे देखील खूप वेदनादायी होते. हा ड्रेस घालायची सवय करून घेण्यासाठी तिला आपल्या श्‍वासावर नियंत्रण ठेवण्याचीही प्रॅक्‍टिस करायला लागली होती. हा ड्रेस घालून ती जेवायलाही बसू शकली नव्हती. तिला कित्येक तास बाथरूमलाही जाता आलेले नव्हते. ताटकळत बसण्याचीही तिला प्रॅक्‍टिस करायला लागली होती. “मेट गाला’नंतर ड्रेस उतरवल्यानंतर कमरेवर, पोटावर आणि पाठीवर व्रण उमटलेले होते, असेही किमने सांगितले. एवढे करायला लागल्यावर चक्क बरगड्या काढून टाकण्याचा मूर्खपणा कोण करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.