– प्राचार्य खुशाल मुंढे
पिण्याचे पाणी शुद्ध स्वरूपातच असावे. पण दूषित पाणी प्यायल्यामुळे अनेक समस्या उद्भवत आहेत. सध्या तर दूषित पाण्यामुळे अनेक साथ आजार डोके वर काढत असल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
.
पिण्यायोग्य पाणी कोणते, कोठून मिळते, कशा पद्धतीने मिळते याची वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून पाण्याचे पाच प्रकार पाडले जातात. ते प्रकार त्याच्या तपासणीतून पीएच किती आहे आणि त्यावरून ते पाणी कशासाठी योग्य आहे हे सांगितले जाते.
पहिला प्रकार – स्ट्राँगली क्लिनिंग पॉवर वॉटर
या प्रकारामध्ये जवळजवळ त्याचा पीएच हा 11.5 एवढा असतो. म्हणजे हे पाणी पिण्यासाठी योग्य नसतं तर ते जे भाज्या फळ यांच्यावर कीटकनाशके फवारलेली असतात त्यांचं निर्मूलन करण्यासाठी या पाण्याचा वापर विशेषतः केला जातो किंवा जी काही सौंदर्यप्रसाधनं वापरतो त्या सौंदर्य प्रसाधनाच्या रिमूव्हलसाठी त्याचा वापर केला जातो.
दुसरा प्रकार – अल्कलाइज्ड पाणी अर्थात केंगेन वॉटर
याचा पीएच हा 8.5 ते 9.5 एवढा असतो. हे पाणी पिण्यासाठी अत्यंत योग्य असते. या पाण्यामुळे आपणाला हार्ट कॅन्सर, किडनी, शुगर, अर्थराइड्स सोयरासिस अशा वेगवेगळ्या आजारापासून आराम आणि मुक्ती मिळू शकते. या पाण्याच्या वापरामुळे शरीरातील अनावश्यक घटक हे लघवीवाटे बाहेर फेकले जातात. त्यामुळे शरीराचे शुद्धीकरण चांगल्या पद्धतीने होते. जवळजवळ 90 टक्के अॅसिडिक युरीन बाहेर फेकली जाते.
जपानी टेक्नॉलॉजीच्या काही मशिन्स आज बाजारामध्ये केंगेन वॉटर अर्थात अल्कलाइज्ड किंवा अल्कलाइन पाणी शुद्धीकरणाच्या माध्यमातून मिळते. सध्याचे नॉर्मल फिल्टर पाणी शुद्धीकरणासाठी वापरले जातात त्याबद्दलही संशोधनाच्या माध्यमातून काही आक्षेप घेतलेले आहेत. कारण त्यामधून मिळणारे पाणी हे हायड्रोजनयुक्त नाही आणि त्यामुळे पाणी शुद्धीकरणावर प्रश्न निर्माण केला जात आहे.
त्याचबरोबर या केंगेन अर्थात अल्कलाइन पाण्याच्या वापरामुळे कोलेस्ट्रॉल ट्राय ग्लिसराइड पेस्टिसाइड शरीरामधून काढून टाकले जातात आणि त्यामध्ये हायड्रोजन सोडले जाते जे की आपल्या शरीरातील रक्ताभिसरणासाठी खूप गरजेचे असते.
तिसरा प्रकार – स्वच्छ पाणी
पाण्याचा पीएच हा 7.0 एवढा असतो. हे पाणी पिण्यासाठी योग्य असतं. सर्वसाधारणपणे बालकांसाठी लागणारे खाद्य पदार्थ बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि औषधी बनविण्यासाठी अत्यंत उपयुक्त असे हे पाणी असते. त्याला स्विट वॉटरसुद्धा म्हटले जाते.
चौथा प्रकार – स्मूथली वॉटर
या प्रकारच्या पाण्याचा पीएच हा 4 ते 6 एवढा असतो. या पाण्याचा उपयोग हा सौम्य स्वच्छता करण्यासाठी सौंदर्याची निगा राखण्यासाठी अर्थात आंघोळ करणे, चेहरा धुणे, केसांची काळजी घेणे, पाळीव प्राण्यांसाठी स्वच्छता या पद्धतीने याचा वापर केला जातो. परंतु हे पाणी पिण्यासाठी योग्य नसते.
पाचवा प्रकार – स्ट्राँगली अॅसिडिक वॉटर
या पाण्याचा पीएच हा 2.5 एवढा असतो. या पाण्याचा वापर फक्त जंतुनाशक गुणधर्म असणारे हे पाणी स्वयंपाक घरातील भांडी स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणार्या पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाते हे पाणी अजिबात पिण्यासाठी योग्य नसते.
वरील पाण्याच्या पाच प्रकारच्या बाबतीमध्ये सर्वसमावेशक विचार केला असता पूर्वी ज्या पद्धतीने वाहत्या पाण्याचा उपयोग पिण्यासाठी केला जात असे, जेणेकरून त्या वाहत्या पाण्यामध्ये भरपूर प्रमाणात हायड्रोजन अल्कलाइन असल्यामुळे आणि नॅचरल हा सोर्स असल्यामुळे त्या पाण्याचा अत्यंत सकारात्मक दृष्टिकोनातून परिणाम आपल्या शरीरावर दिसून येत होता. प्राचीन काळी काही शुद्धीकरणासाठी वेगवेगळ्या मशीन त्या ठिकाणी उपलब्ध नव्हत्या. परंतु बर्याच वेळा वाळूचे दगडाचे थर रचून त्या पाण्याचं शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने केला जात होता.
आपल्या रक्तामधील पीएच हा सर्वसाधारण सात असतो आणि पाणी पिण्यासाठी योग्य कोणतं असेल तर सात पीएच च्या वरती अर्थात आठ ते साडेनऊपर्यंत ज्या पाण्याचा पीएच असेल ते पाणी शरीरासाठी अत्यंत उपयुक्त असे असते. हे सर्व वैज्ञानिकदृष्ट्या तपासले आहे आणि हे पाणी प्रतिकारशक्ती वाढवणारे, आपल्या शरीराची लेव्हल बॅलन्स ठेवणारं, डायबेटीस सारख्या आजारापासून दूर नेणारे आम्लाला बाजूला काढणारे त्याचबरोबर ट्यूमर कॅन्सर असेल स्किन आणि हेअरचे काही प्रॉब्लेम असतील, अंगदुखी, अॅसिडिटी कमी करणारे आणि पचनक्षमता वाढविणारे, रोगप्रतिकार शक्ती वाढविणारे असे हे केंगेन अर्थात अल्कलाइन पाणी आज वापरात आणले पाहिजे.
सध्या वेगवेगळ्या पद्धतीचे आधुनिक साथीचे रोग येत आहेत आणि त्यामुळे समाजामध्ये कुठेतरी भीतीचे वातावरण निर्माण होत आहे त्यास आळा बसेल. खरोखरंच कोणत्याही रोगाच्या मुळाशी विचार केला तर पाणी आणि हवा या दोन गोष्टी त्या रोगाला कारणीभूत ठरतात. त्यामुळे शुद्ध हवा आणि शुद्ध पाणी मिळाले पाहिजे. जीवनात जर सुदृढ शरीर आणि शांती अनुभवायची असेल तर प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतलीच पाहिजे.
आपले शरीर 72 ते 75 टक्के पाण्याने व्यापलेले असते त्या शरीराशी आपण पाणी पिताना कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे हे आपण स्वतः ठरविले पाहिजे.सध्या जीबीएस नावाच्या विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत आहे. जीबीएस हा दूषित पाण्यामुळे होत असल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून दिली जात आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातला नागिण नावाचा रोगसुद्धा दूषित पाण्यामुळेच होतो आहे.
डायरियासुद्धा दूषित पाण्यामुळेच पसरतो. यासारखे अनेक रोगांचे मूळ हे दूषित पाणी असतं. त्यामुळे आपण निरोगी राहण्यासाठी दूषित पाणी न पिता स्वच्छ अल्कलाइन वॉटर घेतलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकाने स्वतःमध्ये जागृती आणून इतरांना जागृत करण्याचा प्रयत्न करावा, हीच अपेक्षा.