नोटाबंदी फसली ?… ९९. ३% नोटा बँकेत परत

नवी दिल्ली: देशामध्ये काळ्या पैश्यांच्याविरोधात मोठा गाजावाजा करत राबवण्यात आलेल्या नोटाबंदीच्या यशावर रिजर्व बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.  रिजर्व बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१६ मध्ये चलनबाह्य केलेल्या ५०० व १००० रुपयांच्या एकूण नोटांपैकी ९९. ३% नोटा रिजर्व बँकेकडे जमा झाल्या आहेत.

आवाहालानुसार,  १५. ४१ लाख कोटी रुपये हे ५०० आणि १००० रुपयांच्या नोटांच्या माध्यमातून भारतीय चलनात होते. त्यातील १५. ३१ लक्ष कोटी रुपयाच्या किमतीच्या नोटा रिजर्व बँकेकडे जमा झाल्या आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“नोटांवरील प्रक्रिया आणि विशिष्ठ बँकांकडून  जमा झालेल्या नोटांची पडताळणी  करण्याचे प्रचंड  मोठे कार्य  पूर्ण झाले” , असे बँकेकडून सांगण्यात आले आहे.

रिजर्व बँकेने सांगितले की, विशिष्ठ बँकांकडून आलेल्या नोटांवर प्रक्रिया आणि मोजणी हे कार्य पूर्ण झाले असून ते अत्याधुनीक ‘हाय स्पीड करन्सी व्हेरीफिकेशन प्रोसेसिंग सिस्टीम (सीव्हीपीएस) च्या माध्यमातून पूर्ण करण्यात आले आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे  त्यात अचूकता आणि सत्यता यावी असे होते,असेही बँकेकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)