#ENGvWI : पराभूत होण्यासाठी आलो नाही – होल्डर

मॅंचेस्टर – इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत पराभूत होण्यासाठी येथे आलो नाही. सांघिक कामगिरीच्या जोरावर ही मालिका जिंकण्याचे ध्येय समोर ठेवले आहे व त्यात निश्‍चितच यशस्वी होऊ, असा विश्‍वास वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर याने व्यक्‍त केला आहे.

या दोन संघातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरची व निर्णायक कसोटीस आजपासून (शुक्रवार) सुरूवात झाली आहे.  करोनाच्या सावटाखाली या दोन संघांत ही मालिका सुरू झाली. त्यातील पहिला सामना जिंकत वेस्ट इंडिजने आघाडी घेतली तर, दुसरा कसोटी सामना जिंकत इंग्लंडने बरोबरी साधली. आता निर्णायक कसोटीत विजय मिळवत मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.