मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यात विरोधीपक्ष नेता वंचितांचा असेल,असे वक्तव्य नांदेड येथील महाजानदेश यात्रेदरम्यान केले होते. दरम्यान आमचा विरोधी पक्षनेता नव्हे, तर मुख्यमंत्री असेल, असे उत्तर प्रकाश आंबेडकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, पुढचा विरोधी पक्ष नेता वंचितचा असेल, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यामुळे त्यांनी वंचितची ताकद वाढल्याचं मान्य केले. त्यांनी चारिटेबली आम्हाला विरोधी पक्षनेते पद दिलं. पण आम्ही त्यांना सांगू इच्छितो वंचितचा मुख्यमंत्री केल्याशिवाय राहणार नाही.