यामी गौतमचं नव्हे तर या अभिनेत्रींनी देखील दिग्दर्शकासोबत बांधली लगीनगाठ

बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमने नुकताच दिग्दर्शक आदित्य धर यांच्याशी गुपचूप विवाह केला आहे. आदित्य धर यांनी ‘द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तर यामीनेही यामध्ये भूमिका केली होती. 

या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान यामी आणि आदित्य दोघेही मनाने एकमेकांच्या जवळ आले. दरम्यान, याआधीही अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शकांसोबत लगीनगाठ बांधली आहे.

राणी मुखर्जी 

राणी मुखर्जीने यश चोप्रा यांचा मुलगा आणि दिग्दर्शक आदित्य चोप्रा यांच्याशी विवाह केला आहे. चोप्रा यांचे याआधीही पायल नाव महिलेशी विवाह झाला होता. यानंतर २०१४ मध्ये राणी मुखर्जी आदित्य चोप्रा यांच्याशी विवाहबद्ध झाल्या.

उदिता गोस्वामी

‘पापा’ चित्रपटात भूमिका केलेली अभिनेत्री उदिता गोस्वामी यांनी दिग्दर्शक मोहित सूरी यांच्याशी विवाह केला. मोहित यांनी मलंग, एक व्हिलन यासारखी चित्रपट दिग्दर्शित केले उदिता उदित गोस्वामी आणि मोहित सूरी यांनी २०१३ मध्ये लग्न केले असून त्यांना एक मुलगी आहे.

सोनी राजदान 

सोनी राजदान यांनी प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट यांच्याशी विवाह केला. सोनी राजदान यांच्याशी लग्न करण्यासाठी महेश भट्ट यांनी पहिल्या पेनिले घटस्फोटही दिला नव्हता. सोनी आणि महेश यांच्या आलिया आणि शाहीन भट्ट अशा दोन मुली आहेत.

दीप्ती नवल 

अभिनेत्री दीप्ती नवल यांनी दिग्गज दिग्दर्शक झाल प्रकाश झा यांच्याशी विवाहबंधनात अडकल्या. परंतु, २००२ साली त्यांच्या घटस्फोट झाला. मात्र, यानंतरही त्यांच्यामधील बॉण्डिंग अतिशय चांगले आहे.

कल्की कोचलीन

कल्की कोचलीनने दिग्दर्शक अनुराग कश्यप यांना जीवनसाथी म्हणून निवडले. दोघेही ‘देव डी’ चित्रपटादरम्यान एकमेकांच्या जवळ आले होते. कल्की कोचलीन आणि अनुराग २०११ मध्ये विवाहबद्ध झाले. परंतु, २०१३ पासून दोघेही वेगळे राहायला लागले आणि अखेर २०१३ साली त्यांच्या घटस्फोट झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.