मुंबई – बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता ‘शाहरुख खान’ यानं कोरोना विषाणूच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारला मोठी मदत केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शाहरुखचे काही दिवसांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून आभार मानले होते.
दरम्यान, शाहरुखची ही मदत भारतापुरतीच मर्यादित राहिली नाही तर, त्यानं परदेशातील गरजूंसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
Thank you, boss ♥️🇹🇹🙏 https://t.co/WbZNUqpmyl
— TrinbagoKnightRiders (@TKRiders) May 8, 2020
कॅरेबियन प्रीमिअर लीगमधील ‘त्रिनबागो नाइट रायडर्स’ संघाचा शाहरुख सहमालक आहे. आणि या संघानं शुक्रवारी त्रिनिदाद अँड टोबॅगो येथील 1000 गरजूंना धान्याचं वाटप केलं. नाइट रायडर्स संघातील किरॉन पोलार्ड, ड्वेन ब्राव्हो, डॅरेन ब्राव्हो, लेंडल सिमन्स आणि सुनील नरीन यांनी हे वाटप केलं. या भागात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
#TKR & HADCO Ltd. came together earlier today to distribute 1000 Food Hampers to the needy during #Covid19 pandemic ♥️
Players, along with support staff, Hadco Team, commissioner of Police, Rotary Club, and Living Waters personally distributed hampers in #TrinidadAndTobago 🇹🇹 pic.twitter.com/waz9xO2wWr
— TrinbagoKnightRiders (@TKRiders) May 7, 2020
”त्रिनबागो नाइट रायडर्सनं HADCO Ltd. सोबत सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. त्यातून त्यांनी शुक्रवारी 1000 गरजूंना धान्याचं वाटप केले. माझ्या संघाचा मला अभिमान वाटतो,” असे शाहरुखनं ट्विट केलं.