मराठवाड्यातील भूमिपुत्रांना पुरस्कार वितरण
रेनबो इंटरनॅशनल स्कूलमध्ये स्नेहमेळावा, चर्चासत्राचे आयोजन
लोणी काळभोर (वार्ताहर) -मराठवाड्याची वैभवशाली परंपरा ज्ञान आणि कष्टाच्या जोरावर यश मिळविण्यासाठी आत्मसात करा, असे आवाहन मराठवाडा समन्वय समितीचे संस्थापक राजकुमार धुरगुडे पाटील यांनी केले.
मराठवाडा मित्र परिवार आणि मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने रेनबो इंटरनॅशनल स्कूल लोणी काळभोर येथे स्नेहमेळावा, चर्चासत्र आणि मराठवाड्यातील भूमिपुत्रांना पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. यावेळी मराठवाडा समन्वय समिती संस्थापक राजकुमार धुरगुडे पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, उद्योजक डी. डी. पवार, प्रा. व्यंकटेश रणखांब, जनार्दन शिंदे, परिवर्तन शिक्षण संस्थेच्या संस्थापक शोभा लगड, समाजसेविका नीता भोसले, मराठवाडा मित्र परिवार संस्थापक रवी पाटील, मराठवाडा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संस्थापक महेश टेळे पाटील आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. व्यंकटेश रणखांब, सुरेश बिराजदार, महेश टेळेपाटील, रवी पाटील यांनीही आपले विचार मांडले.
यावेळी मराठवाडा भूमिपुत्र लोट्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. ओमकुमार हलिंगे यांना मराठवाडा आरोग्यरत्न, ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक विठ्ठल चव्हाण यांना मराठवाडा उद्योगरत्न, पोलीस प्रशासनातील सेवेसाठी एन्काऊंटर स्पेशलिस्ट पोलीस सहायक निरीक्षक अंकुश माने आणि हडपसर क्राईम ब्रॅंच संजय चव्हाण यांना मराठवाडा समाजरत्न, युवा उद्योजक महेश घाटे यांना मराठवाडा युवा उद्योगरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण क्षेत्रातील नागरिक, स्थानिक ग्रामस्थांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरुण गाढवे केले. शिवराज वाघ यांनी आभार मानले. परमेश्वर साळुंखे, भरत शिवपुरे, किशोर पाटील, गणेश शेंडगे यांनी परिश्रम घेतले.