चित्रपटांपासून दूर तरीही व्यस्त

बॉलीवूडमध्ये एकेकाळी मोठे स्टारडम आणि ग्लॅमर असणाऱ्या अनेक दिग्गज अभिनेत्री आता रुपेरी पडद्यापासून दूर आहेत. काही जणी एखाद-दुसऱ्या चित्रपटातून झळकतात, तर काही जाहिरातींमधून. हे सारं त्या करतात कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून. विशेष म्हणजे, या नायिकांना चित्रपटाच्या क्षेत्रापासून दूर राहिल्याची जराही खंत वाटत नाही. उलट त्या अन्य कामांमध्ये रमून गेल्या आहेत. इतक्‍या की आजही त्यांचे दैनंदिन वेळापत्रक व्यस्त असते.

लाब गॅंग’ नंतर जवळपास चार वर्षांनी माधुरी दीक्षित “टोटल धमाल’ या चित्रपटातून पाहायला मिळाली. माधुरीच नव्हे तर बिपाशा बसू, करिना कपूर, शिल्पा शेट्टी, प्रीती झिंटा, करिश्‍मा कपूर, दिया मिर्झा, महिमा चौधरीसारख्या अनेक अभिनेत्री सध्या चित्रपटांपासून दूरच असल्याचे दिसते. त्यांचे चित्रपटांशी नाते जवळपास संपुष्टात आल्यासारखे वाटते. पण गंमत म्हणजे चित्रपटात काम न करताही ह्या अभिनेत्री चर्चेत राहात असल्याचे दिसते. शिवाय त्या सक्रियही आहेत. त्यांची सक्रियता एखाद्या उत्पादनाची जाहिरात करण्यापासून ते समाजसेवा करण्यापर्यंतच मर्यादित नाही. प्रत्येक गोष्टीत त्या आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करीत आहेत. उदाहरणच घ्यायचे तर, कुशल नृत्यांगना असलेली माधुरी दीक्षित अभिनयाबरोबर नृत्याच्या क्षेत्रातही बऱ्याच गोष्टी करू इच्छिते. त्यामुळे तिचा बहुतेक वेळ नृत्यातील नवनव्या उपक्रमांसाठी जातो.

मी स्वतःमध्ये गुंतून राहणे पसंत करते असे माधुरी सांगते. त्यामुळेच की काय पन्नाशी ओलांडलेली आणि दोन मुलांची आई असलेली माधुरी तिचा आवडता दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या “टोटल धमाल’ या चित्रपटात दिसली. दुसरीकडे करण जोहरचा चित्रपट “कलंक’चे चित्रीकरणही तिने पूर्ण केले आहे. चित्रपट करणे हे माधुरीसाठी एक काम आहे. ती सांगते की कुटुंबाची काळजी घेण्याव्यतिरिक्‍त सध्या माझ्या अनेक गोष्टी नियमितपणे सुरू असतात. त्यात सर्वोच्च स्थानी आहे ते नृत्य. आजही मला स्टेजवर कार्यक्रम करायला आवडते. मला एक नृत्यालय सुरू करायचे आहे. त्याविषयी माझे काम सुरू आहे. एवढेच नव्हे तर काही सामाजिक जबाबदाऱ्या पेलण्यातही माझा बराचसा वेळ खर्च होतो. एंडोर्समेंट किंवा जाहिराती तसेच टीव्ही शो देखील कमी नाहीत. त्यामुळे केवळ चित्रपटांच्या भरवश्‍यावर राहू शकत नाही. “टोटल धमाल’, “कलंक’ सारखे चित्रपट मिळाले तर तेही करते. एक गोष्ट नक्‍कीच पक्‍की आहे की, एखाद्या व्यक्‍तीने जीवनात काही साध्य केले तर ती व्यक्‍ती यशस्वी झाली असे म्हटले पाहिजे.

फिटनेसची चाहती बिपाशा
काही दिवसांपूर्वी बिपाशा बसूने आपला 40 वा वाढदिवस साजरा केला. आपल्या पतीबरोबर ती खूप आनंदी दिसत होती. वास्तविक बिपाशाने आपल्या तंदुरुस्तीमुळे वय लपवण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच तर तिला फिटनेस फ्रीक किंवा तंदुरुस्तीची चाहती म्हटले जाते. फिटनेसच्या क्षेत्रात ती सतत व्यग्र असते. बिपाशाची नवी फिटनेस डीव्हीडी देखील येणार आहे. बिपाशा सांगते की माझा वेळ तंदुरुस्तीशी निगडीत खूप खर्च होतो. फिटनेसच्या कॅम्पमध्ये मी सामील होते. त्यामुळेच की काय चित्रपट ही माझ्यासाठी प्राथमिकता राहिलेली नाही. इतरही अनेक गोष्टींची एंडॉर्समेंट किंवा जाहिरातीचे काम असते. 2015 मध्ये “अलोन’ चित्रपटानंतर मी कोणताही चित्रपट केलेला नाही आणि त्याचे दुःखही मला होत नाही. करण्यासाठी इतर खूप कामे आहेत. वय वाढते आहे. पण जेव्हा कोणी असे म्हणते की मी आहे त्या वयापेक्षा पाच वर्षे लहान दिसते तेव्हा मला फिटनेस फ्रीक म्हणून घेणे आवडते.

करिश्‍माचे दैनंदिन आयुष्य
44 वर्षाच्या वयात 2 मुलांची आई असलेली करिश्‍मा कपूर सध्या प्रचंड व्यग्र आहे. काही दिवसांपूर्वी तिने शाहरूखच्या “झिरो’मध्ये आपले दर्शन घडवले होते. हल्ली ती लहान-मोठ्या उत्पादनांच्या जाहिरात किंवा एंडॉर्समेंटमध्ये व्यग्र असते. करिश्‍मा सांगते की, मी चित्रपट संन्यास घेतलेला नाही. पण चित्रपट करणे हे आता मुख्य ध्येय राहिलेले नाही. माझी दोन्ही मुले मोठी आणि समजूतदार झाली आहेत. त्यामुळे आता मला काळजी वाटत नाही. गेल्या काही दिवसांत चांगल्या जाहिरातींचे चित्रीकरण केले. माझ्या दैनंदिन आयुष्यात आराम अजूनही मिळत नाही. अर्थात एक गोष्ट चांगली आहे की मला लोक अजूनही विसरले नाहीत. त्यांच्या आठवणीत मी आहे आणि त्यामुळे माझ्या मनाप्रमाणे मला काम मिळते. त्यामुळे वेळ कसा जाते हे समजत नाही.

खूप व्यग्र आहे शिल्पा
व्यग्र कसे राहावे हे शिल्पा शेट्टीकडून शिकावे. बिपाशा बसूनंतर शिल्पा शेट्टीही तंदुरुस्तीसाठी वेडी आहे असे म्हणूया. 43 वर्षांच्या शिल्पाने तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष दिलेले आहे. तिच्या तंदुरुस्ती किंवा फिटनेसवरील चार डीव्हीडी आल्या आहेत. जाहिराती, एंडॉर्समेंट त्याचबरोबर विविध टीव्हीवरील कार्यक्रम यामध्ये शिल्पा व्यग्र असते. शिल्पाचा नवरा राज कुंद्रा हा मोठा व्यावसायिक असल्याने त्याच्या व्यवसायातही शिल्पा मदत करते. शिल्पा सांगते की, या सर्वांमध्ये चित्रपट मागे पडले असले तरीही चित्रपटांशी असलेले नाते काही तुटले नाही. माझी स्वतःची निर्मिती संस्था आहे. “ढिशक्‍यांव’ नंतर आता पुढचा चित्रपट सुरू करणार आहे.

प्रीती झिंटाचे जग
प्रीती झिंटाच्या बरोबरीच्या अभिनेत्रींमध्ये ती बहुश्रुत आहे. अर्थात, चित्रपट हा तिच्या कामाचा प्रमुख स्रोत नव्हता. सध्या आयपीएलच्या एका टीमची मालकीण असलेल्या प्रीतीला एक उत्तम अभिनेत्री मानले जाते. ती आजही स्वेच्छेने चित्रपट करीत नाही. प्रीती म्हणते मी कधीच म्हटले नाही की मी चित्रपट करणार नाही. अर्थात मनाला भावतील ते चित्रपट जरूर करेन. पण चित्रपट करणे हेच माझे मुख्य लक्ष्य नाही. माझ्याकडे अनेक जाहिराती किंवा एंडॉर्समेंट आहेत. मी वर्तमानपत्रात लिखाणही करते.

37 वर्षीय दिया मिर्झा देखील एक उत्तम अभिनेत्री म्हणून गणली जायची. त्यामुळेच ती चित्रपटांमध्ये काम कमी करते ह्याचे कारणही समजू शकते. पण व्यवहारकुशल असलेली दिया मिर्झा चित्रपटसृष्टीतील आपल्या चांगल्या संबंधाच्या जोरावर सतत काही ना काही करत राहाते. काही महिन्यांपूर्वी तिने राजकुमार हिरानी यांच्या “संजू’ चित्रपटात काम केले होते. टीव्हीवरही सतत काही नवे प्रकल्प करत असते. तिचा नवरा साहिल संघाबरोबर तिने निर्मिती संस्थाही उभारली आहे. त्या कंपनीतही ती व्यग्र असते. दिया सांगते की, चित्रपटात काम करण्याचा माझा काही हट्ट नव्हता पण एक गोष्ट चांगली घडली की मला चित्रपटांचे प्रस्ताव सातत्याने येत गेले.

40 वर्षांहून अधिक वय असलेली रविना टंडनही कुटुंबाची जबाबदारी पेलत काम करते. तिला एकूण चार मुले आहेत. त्यातील 2 मुले दत्तक आहेत. रविना सांगते की लग्नानंतर चित्रपटांच्या मागे धावायचे नाही हे मी पक्‍के ठरवले होते. त्यामुळे एक फायदा असा झाला की, मी टीव्हीवरही व्यग्र झाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.