धनकवडी – खडकवासला मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत कोट्यवधींचा निधी खर्च करून अनेक विकासकामे पूर्ण केली आहेत. यामुळे विजयाची खात्री आहे, मी नाही तर माझे काम बोलते, असे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार भिमराव अण्णा तापकीर सांगितले.
विकासाच्या दिशेने ठळक पावले उचलत तापकीर यांच्या कार्यकाळात अहिरे गावातील रस्त्यांचे नूतनीकरण, नवले पूल ते कात्रज सहापदरी रस्ता, पीएमआरडीए अंतर्गत मुख्य रस्त्यांचे उभारणी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून ग्रामीण भागांतील रस्त्यांचे सशक्तीकरण यासह खडकवासला ते फुरसुंगी बंदिस्त पाण्याचा भुयारी मार्ग, राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत ग्रामीण भागासाठी पिण्याच्या पाण्याच्या सुविधा,
दुर्गम सिंहगड परिसरातील कोळीवाड्यांमध्ये वीजपुरवठा.
चांदणी चौक उड्डाणपूल, स्वारगेट ते कात्रज मेट्रो मार्ग व खडकवासला ते खराडी वारजे ते माळवाडी मुठा नदीवरील पूल, सिंहगड किल्ल्याचा पर्यटन विकास प्रकल्प, धारेश्वर, तुकाईमाता व निळकंठेश्वर देवस्थानांच्या विकासासाठी मूलभूत सुविधा तसेच समाविष्ट 32 गावांमधील मालमत्ता कराच्या प्रश्नावर तोडगा, खडकवासला धरण परिसरात ऑक्सिजन पार्कची निर्मिती, समाजमंदिर, रस्ते, ओपन जिम व ड्रेनेज लाइनसाठी यासारख्या कामांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च करण्यात आला.
आमदार तापकीर यांनी विधानसभेत ४५० पेक्षा अधिक मुद्दे प्रभावीपणे मांडत खडकवासल्यातील प्रश्न सोडविले आहेत. लक्षवेधी सूचना व चर्चांच्या माध्यमातून त्यांनी मतदारसंघातील समस्या समोर आणल्या. याच कारणातून आमदार भिमराव तापकीर यांचे प्रामाणिक कार्य आणि मितभाषी स्वभाव यामुळे मतदारसंघातील जनता त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकणार आहे.
“खडकवासला मतदारसंघाच्या जनतेचा विश्वास हा माझ्या राजकीय प्रवासाचा खरा आधार आहे. विकासाचा आलेख उंचावत ठेवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. खडकवासल्याच्या विकासाचे हे नवे सुरू करणार आहे.” – भिमराव तापकीर, उमेदवार, महायुती