सोशल मिडीयावर नोरा फतेहीच्या नावे सारखे मीम्स पोस्ट होत असतात. मात्र त्यामुळे नोरा फतेहीला काही फरकच पडत नाही. आपल्यावरा मीम्स बनणे ही खूपच छान गोष्ट आहे, असे ती मानते. आपल्यामध्ये एक कॉमेडी प्रवृत्ती दडून बसली आहे. त्यामुळे यात काही गैर आहे, असे तिला वाटत नाही. ती स्वतःला मीम्स क्वीन मानते आहे.
नोरा ऍक्टिंगच्या आकर्षणामुळे कॅनडातून भारतात आली. तिने एक दोन किरकोळ सिनेमांमध्ये काम केले आहे. मात्र अजूनही तिला बॉलिवूडमध्ये म्हणावी तशी ओळख मिळालेली नाही. त्यानंतर “बिग बॉस’ आणि “बाहुबली द बिगीनिंग’सारख्या सिनेमांमध्ये तिने काम केले आणि तिचे नशीबच पालटले.
काही दिवसांपूर्वी “दिलबर’ (सत्यमेव जयते) आणि “ओ साकी साकी’ (बाटला हाऊस) या आयटम गाण्यातही तिचा परफॉर्मन्स प्रेक्षकांना खूप आवडला. तिच्या डान्स स्कीलमुळेच “स्ट्रीट डान्सर 3 डी’मध्ये श्रद्धा कपूर आणि वरुण धवनबरोबर तिची जोडी जमली. त्यानंतर “स्टोरी नाईटस जेन वाय’ या सिरीजच्या एका एपिसोडमध्ये नोराने स्वतःच्या आयुष्यातील महत्वाच्या घटनांबाबत खरी खरी माहिती सांगितली आहे.