भाजपचा जाहीरनामा नसून ‘माफीनामा’ -काँग्रेस

नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीआधी देशभरात राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. निवडणुकीच्या तीन दिवस आधी भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला असून संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांसाठी भरघोस घोषणा करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, काँग्रेसने भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका केली आहे. ​​भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील फरक पहिल्या पानावर दिसून येतो. काँग्रसकडे लोकांची गर्दी आहे तर भाजपच्या जाहीरनाम्यात फक्त एकच माणूस आहे. भाजपने जाहीरनामाऐवजी ‘माफिनमा’ सादर केल्याचे काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.