सेऊऊल – ज्यो बायडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून उत्तर कोरियाने आतापर्यंतच्या सर्वात ताकदवान क्षेपणास्त्राची आज चाचणी घेतली. क्षेपणास्त्रांच्या चाचणीबाबत अमेरिकेबरोबर सुरू असलेल्या वाटाघाटींमधून काहीही निष्पन्न होत नसल्याचे चित्र निर्माण व्हायला लागले आहे. त्यामुळेच उत्तर कोरियाने आज पुन्हा एकदा क्षेपणास्त्रांची ताचणी घेतली आहे.
सीमांचा वाद टाळण्यासाठी उत्तर कोरियाने ही चाचणी आज घेतलेली क्षेपणास्त्र चाचणी उंच भागातून घेतली गेली असल्याचे जपानी आणि दक्षिण कोरियाच्या लष्करी सूत्रांनी म्हटले आहे. हे क्षेपणास्त्र 2 हजार किलोमीटर उंच गेले आणि त्याने 800 किलोमीटर दूरपर्यंतचा प्रवास केला. त्यानंतर हे क्षेपणास्त्र समुद्रात कोसळले.
उत्तर कोरियाने आज चाचणी केलेले क्षेपणास्त्र 2017 पासूनच्या सर्वात लांब पल्ल्याचे होते, असे आतापर्यंत उपलब्ध असलेल्या डाटाच्या आदारे समजते आहे. 2017 मध्ये उत्तर कोरियाने चाचणी केलेल्या दोन क्षेपणास्त्रांनी थेट जपानवरून प्रवास केला होता. त्यानंतर उत्तर कोरियाने चाचणी केलेली 3 आंतरखंडीय त्रेपणास्त्रांची मारक क्षमता थेट अमेरिकेच्या मुख्य भूमीपर्यंत होती.
आज उत्तर कोरियाने केलेली चाचणी या महिन्यातील सातवी चाचणी आहे. उत्तर कोरियाने 2018 मध्ये स्वतःवर आण्विक शस्त्रांच्या चाचण्या न करण्याचे बंधन घातले होते. मात्र हे स्वतःचे निर्बंध उत्तर कोरियाने झुगारून दिले असल्याचे मत दक्षिण कोरियाच्या अध्यक्षा मून जेई यांनी व्यक्त केले आहे. जपाननेही या दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्र चाचणीबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे.