सेऊल : उत्तर कोरियाकडून त्यांचे हुकुमशाह किम जोंग उन यांच्या विषयी मोठा खुलासा करण्यात आला आहे. किम जोंग उन हे जिवंत असून त्यांची प्रकृतीही उत्तम असल्याची माहिती उत्तर कोरियाकडून देण्यात आली. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यापूर्वीही किम जोंग उनच्या मृत्यूचं वृत्त उत्तर कोरियाने फेटाळले होते.
“किम जोंग उन यांची प्रकृत्ती उत्तम आहे आणि ते जिवंत आहेत. ते १३ एप्रिलपासून वॉनसन या ठिकाणी वास्तव्यास आहेत,” अशी माहिती उत्तर कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जी यांचे परराष्ट्र विषयांचे सल्लागार मून चंग इन यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. तसेच उत्तर कोरियाचे संस्थापक आणि त्यांचे आजोबा यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातही त्यांनी सहभाग घेतला नव्हता. त्यानंतर किम जोंग उन यांच्या मृत्यूच्या चर्चांना उधाण आले होते.
१५ एप्रिलचा दिवस हा उत्तर कोरियाच्या इतिहासातील महत्त्वाचा दिवस मानला जातो. २०११ मध्ये आपल्या वडिलांच्या हातून सत्ता मिळाल्यानंतर त्यांनी आतापर्यंत या दिवशी होणारा कार्यक्रम कधीही काही दिवसांपूर्वी उन यांची प्रकती बिघडल्याची माहिती समोर आली होती. त्यांच्यावर कार्डीओवॅस्क्यलरमुळे उपचार सुरू असल्याचे समोर आले होते. काही दिवसांपूर्वी त्यांच्यावर एक शस्त्रक्रिया करण्यात आली होती परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाल्याच्याही चर्चा सुरू झाल्या होत्या. परंतु आता उत्तर कोरियानं दिलेल्या माहितीनंतर त्यांच्या मृत्यूच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.