उत्तर कोरियाने पुन्हा केली क्षेपणास्त्र चाचणी

सेउल – उत्तर कोरियाने पुन्हा एकदा दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने खळबळ उडाली आहे. उत्तर कोरियाने या चाचण्या घेतल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी केल्याने एकच खळबळ उडाली आहे. ऑगस्टमध्ये दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये सयुंक्‍त युध्द सराव होणार आहे. त्या आधीच उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्याने कोरियाच्या जमिनीवर पुन्हा एकदा तणाव निर्माण होऊ शकतो.

एका वृतानुसार, उत्तर कोरियाकडून पूर्वेकडील समुद्रात म्हणजेच जपानच्या समुद्रात दोन क्षेपणास्त्र चाचण्या घेण्यात आल्या. उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग उन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची या वर्षीच जून महिन्यात एकत्र बैठक झाली होती. त्या आधी 9 मे रोजीही उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचण्या घेतल्या होत्या. त्यामध्ये दोन क्षेपणास्त्र सोडले होते. यावेळी दोन रॉकेटही सोडले गेले होते. त्यातच पुन्हा एकदा उत्तर कोरियाने या चाचण्या केल्याने पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, केसीएनए या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तात किम जोंग उन यांनी क्षेपणास्त्र कार्यक्रमाच्या अधिकाऱ्यांसमवेत नवनिर्मित पानबुडीचे निरीक्षण केल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, उत्तर कोरियाने कोणतीही चाचणी घेतली आहे ही माहिती मिळवण्यासाठी दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या गुप्तहेर संघटनेकडून तपास सुरू आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची जून महिन्यात उत्तर कोरियाचे हुकुमशहा किम जोंग यांच्यात भेट झाली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेत किम जोंग यांनी ट्रम्प यांना उत्तर कोरिया आपले अण्वस्त्र कार्यक्रम बंद करणार असल्याचे सांगितले होते. या भेटीआधी सिंगापूरमध्येही ट्रम्प यांनी किम जोंग यांच्याशी या विषयावर चर्चा केली होती. मात्र या भेटीनंतर उत्तर कोरियाला फारसा फरक पडल्याचे दिसत नाही. तर, जपानने यावर बोलताना उत्तर कोरियाच्या या चाचण्यांचा आमच्या सागरी क्षेत्रावर कोणताही परिणाम झाला नसल्याचे म्हटले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)