उत्तर कोरियाला अमेरिकेबरोबरच्या चर्चेत स्वारस्य नाही

सेऊल- अमेरिकेबरोबर आण्विक वाटाघाटींवरील चर्चा त्वरित सुरू करण्यात आपल्याला स्वारस्य नाही, असे उत्तर कोरियाने शनिवारी पुन्हा एकदा स्पष्ट केले. उत्तर कोरियाविरोधी धोरणांना जोपर्यंत अमेरिका सोडून देत नाही, तोपर्यंत या चर्चेत आपल्याला स्वारस्य नसल्याचे उत्तर कोरियाने म्हटले आहे. उत्तर कोरियाच्या प्रथम विदेश उपमंत्री चो सोन हुई यांनी यासंदर्भातील निवेदन प्रसिद्ध केले आहे.

अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक होण्यापूर्वी ऑक्‍टोबरमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्याबरोबर अचानक आणखी एक शिखर परिषद करण्याची शक्‍यता आहे, असे ट्रम्प यांचे माजी सुरक्षा सल्लागार जो बिडेन अलिकडेच म्हणाले होते. त्यानंतर लगेचच उत्तर कोरियाने हे स्पष्टिकरण दिले आहे.

किम जोंग आणि ट्रम्प यांच्यात उत्तर कोरियातील आण्विक शस्त्रास्त्रांच्या साठ्या संदर्भात 2018 मध्ये तीन वेळा चर्चा झाली आहे. निबंध हटवण्याची उत्तर कोरियाने केलेली मागणी अमेरिकेने फेटाळली होती. त्यानंतर गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये व्हिएतनाममध्ये झालेल्या परिषदेनंतर या वाटाघाटी फिसकटल्या होत्या.

जोपर्यंत काही ठोस मोबदला मिळत नाही, तोपर्यंत विदेश धोरणासंदर्भात उच्चस्तरिय बैठकीसाठी अमेरिकेचा विचार केला जाणार नाही, असेही चो यांच्या निवेदनात स्पष्ट केलेले आहे. उत्तर कोरियाला विरोध करण्याचे धोरण जोपर्यंत अमेरिका सोडून देत नाही, तोपर्यंत कोणतीही चर्चा करण्यात आपल्या देशाला स्वारस्य नसल्याचे चो यांनी म्हटले

आहे. किमान नोव्हेंबरपर्यंत उत्तर कोरियाकडून अमेरिकेबरोबर कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे अभ्यासकांचे मत आहे. कारण नोव्हेंबरमधील अध्यक्षीय निवडणुकीत अमेरिकेत अध्यक्ष बदलले जाण्याची शक्‍यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.