सेऊल – उत्तर कोरियाने युरेनियम समृद्धीकरण प्रकल्पांची व्याप्ती वाढवल्याचे अलिकडेच उपग्रहांद्वारे उपलब्ध झालेल्या छायाचित्रांद्वारे स्पष्ट झालेले आहे. उत्तर करियामधील महत्त्वाच्या यांगब्यान येथील अणू प्रकल्पामध्ये हे युरेनियम समृद्ध केले जात असल्याचे यामध्ये दिसत आहे.
त्यामुळे उत्तर कोरियाकडून अणूबॉम्बच्या निर्मितीला वेग दिला जात असल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.उत्तर कोरियाने अलिकडेच केलेल्या क्षेपणास्त्र चाचणीच्या पार्श्वभूमीवर ही छायाचित्रे उपलब्ध झाली आहेत.युरेनियमचा साठा 25 टक्क्यांनी वाढवण्याचा उत्तर कोरियाचा प्रयत्न आहे, असे तज्ज्ञांनी म्हटले आहे.
याप्रकल्पाच्या शेजारीच नव्याने बांधकाम सुरू केले जात असल्याचे या छायाचित्रातून दिसत आहे. या नवीन बांधकामाचा परिसर अंदाजे 1 हजार चौरस मीटरचा असून या ठिकाणी 1 हजार अतिरिक्त सेंट्रिफ्युज बसवण्याइतकी सुविधा आहे. एवढ्या सेंट्रोफिओज मशिनद्वेरे युरेनियम समृद्ध करण्याची क्षमता 25 टक्क्यांनी वाढवली जाऊ शकेल.