उत्तर कोरियात अद्याप करोनाचा एकही रूग्ण नाही

सेऊल – आमच्या देशात अजूनही करोनाचा प्रवेश आम्ही होऊ दिलेला नाही असा दावा उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेकडे केल्याचे वृत्त आहे. एक वर्षापुर्वी जगात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला होता पण अजूनही आमच्या देशात करोनाचा एकही रूग्ण आढळून आलेला नाही ही आमच्यासाठी राष्ट्रीय अभिमानाची बाब आहे असे उत्तर कोरियाने जागतिक आरोग्य संघटनेला कळवले आहे.

यावर आपण कसे नियंत्रण मिळवले आहे याचा तपशील देताना उत्तर कोरियाने म्हटले आहे की आम्ही आमची सीमा पुर्ण बंद केली असून विदेशी पर्यटक आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या देशात घालवून दिले आहे. ज्यांना करोनाची लागण झाल्याचा संशय जरी आला तरी त्या हजारो लोकांना आम्ही विजनवासात पाठवले आहे. 

या देशाची सीमा चीनला लागून आहे आणि उत्तर कोरियात आरोग्य यंत्रणा यथातथच आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्तर कोरियाचा हा दावा संशयास्पद आहे असे काहींचे म्हणणे आहे. उत्तर कोरियात आत्तापर्यंत 23 हजार 121 रूग्णांची करोना संशयावरून चाचणी घेण्यात आली पण ती निगेटीव्ह आली असे आम्हाला सांगण्यात आले आहे असे जागतिक आरोग्य संघटनेच्या उत्तर कोरियातील प्रतिनिधीने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.