प्योंगयोंग – उत्तर कोरियातील सुमारे 8 लाख लोकांना अमेरिकेबरोबर युद्ध हवे आहे, असा दावा उत्तर कोरियाने केला आहे. उत्तर कोरियातील सरकारी वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केले आहे. देशातील 8 लाख विद्यार्थी आणि कामगारांनी अमेरिकेबरबोरच्या युद्धासाठी सैन्यात भरती होण्याची इच्छा व्यक्त केली आहे, असे या वृत्तामध्ये म्हटले आहे.
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेदरम्यान सध्या ‘”फ्रीडम शील्ड युद्धसराव सुरू आहे. ही युद्धसराव म्हणजे उत्तर कोरियावर हल्ल्याची पूर्वतयारी असल्याची टीका उत्तर कोरियाने केली आहे.
या युद्धसरावाला उत्तर देण्यासाठी उत्तर कोरियाने गुरुवारीच वॉसोंग-17 या आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची चाचणी केली आहे. ही क्षेपणास्त्र चाचणी म्हणजे अमेरिका आणि दक्षिण कोरियाला दिलेला एक समर्थ इशारा आहे, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील – एलॉन मस्क
दक्षिण कोरिया आणि अमेरिकेच्या मोठ्या प्रमाणावरील उन्मत्त, प्रक्षोभक आणि चिथावणीखोर युद्धसरावामुळे कोरियाच्या द्विपकल्पामध्ये सर्वाधिक अस्थिर वातावरण बनले आहे, असे उत्तर कोरियाने म्हटले आहे.