….म्हणून नोरा म्हणते, “मुझे निंद न आये’

झोप ही सर्वांच्याच आवडीची गोष्ट आरोग्यासाठीही तितकीच महत्त्वाची आणि आवश्‍यक. हल्ली बदललेल्या जीवनशैलीमुळे तर सकाळी 9-10 वाजता ऑफिसमध्ये जांभया  देणारे किंवा डोळ्यांवर झापड असणारे अनेक जण दिसतात. एकीकडे अशी स्थिती असताना बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री आणि दिलबर, साकी साकी, गरमी यांसारख्या गाण्यांमधील आपल्या नृत्यामुळे लोकप्रिय झालेली नोरा फतेही सध्या “मुझे निंद न आये’ म्हणताना दिसत आहे. कदाचित हा लॉकडाऊन इफेक्‍ट असेल; पण त्यामुळे ती त्रस्त झाली आहे.

याबाबत नोरा सांगते की, मी झोपण्याचा पुरेपूर प्रयत्न करते; पण मला इन्सोम्निया अर्थात अनिद्रा किंवा निद्रानाशाचा त्रास जडला आहे. त्यामुळे मला झोपच येत नाही. नोराने याबाबतचा खुलासा एका टिकटॉक व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. हा व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवरही शेअर केला आहे. 17 लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलेल्या या व्हिडिओतून तिने “आणखी कुणाला असा त्रास होतोय का’ असा सवालही विचारला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.