डान्सिंग सेन्सेशन आणि अभिनेत्री नोरा फतेहीचे इंस्टाग्रामवर 1.5 कोटीहून अधिक फॉलोअर्स झाले आहेत. नोराने इंस्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे, ज्यात ती “स्वदेशी’ लूकमध्ये दिसून येत आहे. यात नोरा साडीसह “नथ’ घातलेली असताना खूपच सुंदर दिसत आहे.
तिने फोटो शेअर करत कॅप्शन दिले आहे की, मला खाली नदीवर भेटा, जिथे आपण प्रत्येक तालावर ठेका धरू, जोपर्यंत उन्हामुळे येथील पाणी कोरडे होत नाही. 15 मिलियन. गतमहिन्यातच नोराचे इंस्टाग्रामवर 1.4 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाले होते.
त्यावेळी तिने याचा जल्लोष करत एक क्षण चाहत्यांशी शेअर केला होता. बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट नृत्यांगनांपैकी नोरा ही एक उत्कृष्ट नृत्यांगना आहे. तिने “बाहुबली ः द बिगिनिंग’मध्ये “मनोहरी’, “सत्यमेव जयते’मध्ये “दिलबर’, “बाटला हाऊस’मध्ये “ओ साकी साकी’, “स्री’मध्ये “कमरिया’, “स्ट्रीट डान्सर-3’मध्ये “गर्मी’ अशा गाण्यांमधून आपल्या नृत्याने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे.