नोरा फतेहीला “दिलबर’मुळे मिळाले आणखी एक गाणे

नोरा फतेहीने “सत्यमेव जयते’मध्ये “दिलबर’ हे आयटम सॉंग केले आहे. त्याचा व्हिडीओ रिलीज झाल्यापासून एकाच दिवसात तब्बल 20 मिलीयन वेळा बघितले गेले आहे. या गाण्याला सोशल मिडीयावर 100 मिलीयनपेक्षाही जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. नोराने केलेल्या बॅले डान्सला सर्वाधिक प्रशंसा मिळायला लागली आहे. नोरा फतेही आणि “सत्यमेव जयते’चा प्रोड्युसर निखील आडवाणी यांनी प्रथमच एकत्र काम केले आहे. “सत्यमेव जयते’मधील आयटम सॉंग नेहा कक्कडने गायले आहे आणि त्या गाण्याला भानुशालीने संगीत दिले आहे. अरबी डान्सच्या धर्तीवर नोराला डान्स स्टेप्स दिल्या गेल्या होत्या. या गाण्याचा उपयोग आता “सत्यमेव जयते’च्या प्रमोशनसाठी नक्कीच केला जाणार आहे, हे उघड आहे.

हे गाणे सुष्मिता सेनच्या “सिर्फ तुम’मधील “दिलबर…’ या गाजलेल्या गाण्याचा रिमेक आहे. हल्ली सगळ्याच गाजलेल्या जुन्या गाण्यांचे रिमेक केले जातात. पण ती सगळीच एवढी गाजतात, असे नाही. हा नियम नोराने खोटा ठरवला आहे. या गाण्यामुळे भारतीय वंशाची कॅनेडियन अॅॅक्‍ट्रेस नोरा फतेहीची लोकप्रियता दिवसरात्र वाढायला लागली आहे. तिची डिमांड एवढी वाढली आहे की तिला अशाच प्रकारचे आणखी एक झक्कास गाणे मिळाले आहे. सैफ अली खान आणि चित्रांगदा सिंह यांच्या मुख्य भूमिका असलेल्या “बाजार’मध्येही तिला अशाच प्रकारचे एक आयटम सॉंग साकारायचे आहे. तिने या गाण्यासाठी कॉंट्रॅक्‍ट साईनही केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“सत्यमेव जयते’मध्ये जॉन अब्राहम आणि मनोज वाजपेयी हे लीड रोलमध्ये असतील. त्यांच्याबरोबर आयेशा शर्माही त्या सिनेमाचे आकर्षण असेल. आयेशासाठी ही बॉलिवूडमधील एन्ट्री असेल. त्याच्याशिवाय अमृता खानविलकरचाही एक छोटासा रोल यामध्ये असणार आहे. नोरा फतेहीला आता “बाजार’मधील गाण्याबरोबरच “स्त्री’ या सिनेमातही असेच एक धम्माल गाणे सादर करण्याची संधी मिळाल्याचे समजते आहे. “स्त्री’ मध्ये ती राजकुमार रावबरोबर दिसणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)