मुंबई – बॉलीवूडची प्रख्यात अभिनेत्री आणि दिलबर, साकी साकी, गरमी यांसारख्या गाण्यांमधील आपल्या नृत्यामुळे नोरा फतेही चांगली लोकप्रिय झाली आहे. ती नेहमी सोशल मीडियावर आपल्या डान्स मूव्ह शेअर करत असते.
यातच अल्पावधीतच सर्वोत्कृष्ट डान्सर म्हणून प्रसिद्धी मिळविलेल्या नोराने “मनोहरी’, “ओ साकी साकी’, “कमरिया’ आणि “गर्मी’ या सारख्या गाण्यामधून आयटम डान्स करत प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य केले आहे. तिचे इंस्टाग्रामवर 1.4 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिच्या कोटींहून अधिक फॉलोअर्समुळे तिने टाकलेल्या पोस्ट लगेच ट्रेडिंग होत असतात.
नोराने पोस्ट केले की,’तिने ‘एक तो कम जिंदगानी’ या धमाकेदार गाण्यावर आयटम डान्स करत असलेला व्हिडियो शेअर केला आहे.ज्यामध्ये ती बेली डान्स करताना दिसत आहे. सध्या हा व्हिडियो चांगलाच व्हायरला होत आहे.