नोरा फतेही बॉलिवूडमध्ये तिच्या अभिनय आणि आयटम नंबरसाठी ओळखली जाते. तिचे प्रत्येक गाणे सुपरहिट ठरते. नोराच्या डान्सने सर्वांनाच वेड लागले आहे. नोरा नेहमीच तिच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलताना दिसते.
अशात नोरा स्टायलिंगबद्दल उघडपणे बोलली आहे. नोराने खुलासा केला आहे की तिला च्या स्टायलिस्ट आणि निर्मात्यांना सांगावे लागते कि जान्हवी कपूर, सारा अली खान आणि अनन्या पांडेसारखे कपडे मला घायचे नाही. कारण त्यांच्यात आणि माझ्या शरीरयष्टी फरक आहे स्टायलिस्टला मी सांगितले समजत नाही पण शेवटी ते मान्य करतात.
एका मुलाखतीत नोरा फतेहीने बॉलीवूडमधील स्टाइलिंगबद्दलच्या तिच्या अनुभवाबद्दल मोकळेपणाने सांगितले. बॉलीवूडमधील तिच्या अनुभवांबद्दल मोकळेपणाने बोलताना नोराने सांगितले की, इंडस्ट्रीमध्ये स्टाइलिंगचा प्रश्न येतो तेव्हा तिला तिच्या तार्किक सूचना कशा सांगाव्या लागतात.
नोराने 2013 मध्ये इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. त्यानंतर ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. ज्यामध्ये भारत, भुज, मडगाव एक्सप्रेस, क्रॅक अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. यासोबतच तिने अनेक आयटम साँग देखील केले आहेत जे खूप लोकप्रिय झाले आहे.