#प्रभात_दीपोत्सव_२०२० : हॅंसता हुआ नूरानी चेहरा…

– श्रीनिवास वारुंजीकर


भारतीय सिनेसृष्टीमध्ये आपल्या मधुर हास्याने आनंदाची कारंजी फुलवणाऱ्या अभिनेत्री आजही अविस्मरणीय आहेत. अत्यंत विपरीत अशा सध्याच्या संपूर्णपणे नकारात्मक वस्तुस्थितीचा थोडासा विसर पडावा आणि आपल्याही मुखकमलावर एक स्मितरेषा उमलावी, याच हेतूने आम्ही आपणासाठी सादर करत आहोत हिंदी सिनेसृष्टीतील काही अविस्मरणीय स्मितरेषा. होय. हास्य, स्मितहास्य, खळखळून हसणं, स्माईल, लाफ किंवा मुस्कुराहट, हॅंसी, तबस्सुम नाव कुठलंही द्या, अगदी कुठल्याही भाषेतलं, असे चेहरे आपल्यासमोर आले की, आपणही क्षणभर आपल्या विवंचना, दु:खं विसरतो आणि एक आनंदाचा प्रवास सुरू होतो, आपल्या आत… खोलवर… विख्यात ग्रीक तत्त्ववेत्ता खलील जिब्राननं म्हटलं आहे की, युवर जॉय इज युवर सॉरो अनमास्कड्‌…’ असं असलं तरी आनंदाच्या वेळेला चेहऱ्यावर 

उमटणाऱ्या स्मितहास्याची किंमत अमूल्यच असते. तुम इतना जो मुस्कुरा रहे हो… क्‍या ग़म है, जिसे छुपा रहे हो…’ असं कैफी आज़मीने कितीही म्हटलं असलं तरी हास्य हे आपल्या प्रत्येकाच्या जीवनाचा एक अविभाज्य भागच असतं. चला तर मग या सदाबहार हास्यमैफिलीला सुरुवात करू या…


मधुबाला  

धड़कने लगे दिल के तारों की दुनिया जो तुम मुस्कुरा दो, संवर जाये हम बेकरारों की दुनिया जो तुम मुस्कुरा दो,

जुन्या जमान्यातील म्हणजे साधारण पन्नासच्या दशकातील एव्हरग्रीन आणि फ्रेश चेहरा म्हणजे मधुबालाचा. भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासात सर्वाधिक सौंदर्यवान अभिनेत्रीचा मान आजही जिच्यासाठी राखीव आहे ती मधुबाला म्हणजे मूळची मुमताज़ जहॉं बेगम देहलवी. अवघं 33 वर्षांचं आयुष्य जगलेली पण आपल्या 20-22 वर्षांच्या फिल्मी करिअरमध्ये एकाहून एक सरस भूमिका गाजवलेल्या मधुबालाचं स्मितहास्य म्हणजे भल्याभल्यांना घायाळ करणारं अस्त्रंच होतं. भारतीय सिनेसृष्टीतील महामुव्ही म्हणून ज्या सिनेमाचा गौरव केला जातो, त्या “मुघल-ए-आज़म’ या सिनेमात, नायक दिलीपकुमारला कॉंटों को मुरझाने जा खौंफ नही रहता…’

असं बिनदिक्कतपणे सांगणारी मधुबाला म्हणजे चित्रपटसृष्टीची जिती-जागती दंतकथा होती. “हावडा ब्रिज’मध्ये दादामुनी अशोककुमारसमवेत आणि मिस्टर ऍण्ड मिसेस 55’मध्ये “शापित यक्ष’ गुरुदत्तसमवेत दंगा करणारी मधुबाला, चॉकलेट हिरो’ देव आनंदसमवेत “काला पानी’ रंगीत करून गायक अभिनेता किशोरकुमारसमवेत “चलती का नाम गाडी’मध्ये ज्यावेळी “एक लडकी भिगी भागी सी…’ बनून येते, तेव्हा दिल की तार’ आपसूनच छेडली जाते, दिलाची धडकनही तेज होते आणि रोजच्या जगरहाटीमधलं जगणंही सुसह्य होतं, ती मधुबाला…


माधुरी दीक्षित 

मैं जीने की तमन्ना लेके जाता हूँ रोज़ उसके पास,
वो रोज़ अपनी मुस्कुराहट से, मेरा क़त्ल कर जाती है !

अरे, ती पहा, दुसरी मधुबाला अवतरलीय… तिचं हसणं, लाजणं-मुरडणं तरी बघा… सेम मधुबाला…’ असं जिच्याबाबत सर्वप्रथम बोललं गेलं, ती सौंदर्यशलाका म्हणजे माधुरी दीक्षित. टॉम बॉय’ अनिलकपूर समवेत तेज़ाब’मधली मोहिनी बनून तिनी जो धुमाकूळ घातला, तो अव्याहत 20 वर्षे तरी भारतीय सिनेरसिक दिन-गिनके’ लक्षात ठेवतीलच.

 प्यार का कारोबार तो बहुता बार किया, देवबाबू; पर प्यार सिर्फ एक बार किया हैं…’ असं आर्तपणे काकुळतीला येत देव अर्थात शाहरुख खानला सांगणारी चंद्रमुखी तथा माधुरी दीक्षित म्हणजे भूमिकेचं आव्हान पेलण्याची पूर्ण क्षमता सिद्ध करणारं व्यक्तीमत्त्व. याच माधुरीनं मग न्यू चॉकलेट बॉय’ आमीर खानसमवेत दिल’, बिईंग ह्युमन’ सलमान खानसमवेत हम आपके हैं कौन…’ तर राहुल… नाम तो सुना होगा…’ शाहरुख खान समवेत दिल तो पागल हैं’मधली 

माया सजवताना आपल्या दिलखेचक अदांचे असे काही साक्षात्कार घडवले की, तिला पाहणारा प्रत्येक जणच तिचा दिवाना होऊन जायचा. माधुरी आपल्याकडे पाहून हसतीय म्हणजे आता आपला क़त्ल’ होणार, असंच वाटायचं प्रत्येकाला.


जुही चावला

देखनेवाले मुस्कुराहट को करम मत समझो
उन्हे तो देखनेवालों पे हॅंसी आती हैं

नव्वदच्या दशकाची सुरुवात ज्या मॅटीनी हिट’ म्हणून संभावना केली गेलेल्या क़यामत से क़यामत तक’ ने झाली, त्यावेळी बॉलीवूडला एक नवा सदासतेज, सदाबहार हसरा चेहरा मिळाला, तो जुही चावलाच्या रुपाने. पदार्पणातच आमीर खानसमवेत गोल्डन ज्युबिली झालेल्या जुहीने नंतर आमीर-

समवेतच “हम हैं राही प्यार के’ मधून हास्याची कारंजी फुलवली. एक सदाबहार आणि पॉझिटिव्ह एनर्जी देणारा हा सिनेमाही लोकमान्यतेस उतरला. मात्र, शाहरुख खानच्या डर’मध्ये जुहीच्या हसऱ्या चेहऱ्यावरचं मावळलेलं हसणं सहन करावं लागलं, तर शाहरुखच्याच समवेत तिनं केलेला “फिर भी दिल हैं

हिन्दुस्तानी…’ने आणि “येस बॉस’ने नवनवे रेकॉर्डस ब्रेक केले. शबाना आज़मी समवेत तिने केलेले चॉक अँड डस्टर’ आणि गुलाब गॅंग’ या वेगळ्या सिनेमांनीही एक वेगळी जुही प्रेक्षकांना दिसली. पण जिला पाहिलं की सतत आनंदाची कारंजी उडत आहेत, असं वाटत रहातं, ती जुही कधीही विसरली जाऊ शकतच नाही.


दीपिका पदुकोण

ये इष्क नहीं आसॉं बस इतना समझ लिजिये
इक आग का दरिया हैं और डूब के जाना हैं

आधीची नॅशनल चॅम्पियन बॅडमिन्टन प्लेअर आणि नंतरची सुपरहिट अभिनेत्री म्हणजे दीपिका पदुकोण. रणवीरसिंगसमवेत बाजीरावाची मस्तानी बनलेली दीपिका आणि अल्लाउद्दीन खिलजीसारख्या क्रूर आक्रमकाविरोधात यल्गार’ करणारी राणी पद्मावती बनलेली दीपिका म्हणजे नव्या जमान्यातलं एक मोहमयी लावण्यवतीचं रूप. जिनं आरशात पाहताच, जिच्या लावण्यतेजानं आरसाच खळकन फुटून जावा, अशी रूपगर्विता म्हणजे दीपिका.

शाहरुख खानसमवेत डबलरोलमध्ये थेट ओम शांती ओम’द्वारे गाजलेलं पदार्पण असो की, त्याच्याच समवेत केलेला चेन्नई एक्‍सप्रेस’ असू दे, दीपिकाने सर्वस्पर्शी भूमिका तितक्‍याच समरसतेनं पेलल्या. एखाद्या हळूवार झुळुकीसारखी सिनेसृष्टीत आलेल्या दीपिकाने छपाक’ आणि पिकू’सारखे आव्हानात्मक रोल्स तर केलेच शिवाय बॉक्‍स ऑफिसवर आपले वजन जराही कमी होणार नाही, अशी गोलियों की रासलीला रामलीला’ सारखी नव्या युगाची प्रेमकहाणी साकारतानाही ती कचरली नाही.

मग रेस-2’मधली एलिना असो की कार्थिक कॉलिंग कार्थिक’मधली शोनाली मुखर्जी असो; चॉंदनी चौक टु चायना’ मधली सखी-सुझी असो किंवा देसी बॉईज’मधली राधिका अवस्थी, दीपिकाचं मोहक हास्य तिच्या गालाला पडणारी खळी एक प्यारभरी दुखरी संवेदना नक्कीच जागी करतं.


प्रिती झिन्टा

दिल में तुफान हो गये बरपा तुमने जब मुस्कुरा के देख लिया ती रुपेरी पडद्यावर आली होती, ती अगदी पाहुण्यासारखी. बहुधा फार दिवस आपण इथं राहणार नाही, याची जाणीव तिला आधीच झालेली असावी. मग जाता जात करायचं काय तर, आपलं अस्सल गोरंगोरं स्किन कॉम्प्लेक्‍शन, सफरचंदासारखे गाल आणि त्यावरची ती जीवघेणी खळी याचा आनंद तरी सिनेरसिकांनी घ्यावा, म्हणून जिनं रुपेरी पडदा अधिक तेजस्वी केला, ती रूपसुंदरी म्हणजे प्रिती झिंटा.

नबाब सैफ अली खानसमवेत गाजलेला तिचा क्‍या कहना’ हा सिनेमा म्हणजे कुमारपणातील मातृत्त्वाच्या प्रश्‍नावरचा गंभीर सिनेमा. प्रेम किती सच्चं आणि पवित्र असू शकतं आणि ते निभावण्याची शक्ती तुमच्यात असेल, तर काय होऊ शकतं, याचं सार्थ चित्रण असलेला हा सिनेमा प्रितीच्या गालावरच्या खळ्या मोजता-मोजता संपतो. “दिल चाहता हैं’ या मैत्रीच्या कोलाजमध्ये आमीरसमवेत, सोल्जर सोल्जर दिल की बाते बोल कर…’ असं बॉबी देओलला सांगणारी आणि आणि कोई मिल गया’मध्ये राकेश रोशनसमवेत प्रिती झिन्टानं बहार आणली आहे. तिचे अजूनही हिट्‌स आहेतच, पण जिच्याबाबत ती पाहताच बाला, क़लिज़ा खलास झाला…’ असं वाटतं, ती प्रितीच.


काजोल

नज़र जब मिली तो फसाने हुए
एक पल मे हम आप के दिवाने हुए
जब से आये हैं आप हमारी जिंदगी में
अंदाज़ ही हमारे कुछ शायराना हुए 

‘मेग रायनच्या फ्रेन्च किस’ या सिनेमाचा भारतीय अवतार पहायचा असेल, तर काजोल- अजय देवगणचा प्यार तो होना ही था…’ अवश्‍य पहावा. केवळ त्यासाठी नव्हे, तर भोळ्या-भाबड्या प्रसंगी बावळट समजल्या जाणाऱ्या काजोलच्या अदा पहायला आणि फ्रेश व्हायला, यासारखा दुसरा सिनेमा नाही.

शाहरुख खानसमवेत “बाज़ीगर’, कुछ कुछ होता हैं’, कभी खुशी कभी ग़म’ आणि ग्रेटेस्ट सुपरहिट “दिलवाले दुल्हनियां ले जायेंगे…’ अशा कोणत्याही सिनेमात तुम्हाला नजरेने बोलणारी आणि ओसंडून हसणारी काजोल दिसेल. “फना’मध्ये आमीरवर आंधळं प्रेम करणारी अंध युवती तर गुप्त’ मध्ये बॉबी देओलवर पझेसिव्ह’ प्रेमासाठी कोणत्याही थराला जाणारी काजोल बघितली की तिचे नखरे, ठसके आणि अंदाज मनावर अधिकच कोरले जातात.


बिपाशा बसू

सबकी निगाहों में हो साकी ये तो जरुरी हैं, मगर
सब पे साकी की नज़र हो ये तो जरुरी नहीं ती शेजारून गेली आणि तुम्ही वळूनही बघितलं नाहीत, तर? हाय रे दैवा. तुमच्यासारखे कमनशिबी तुम्हीच.

अतिशय भावगर्भ डोळे आणि आवाजात अशी काही कशिश- आर्तता की समोरच्याने थिजूनच जावे. पण तितकाच सुंदर चेहरा आणि मधाळ हास्य म्हणजे बिपाशा बसु. सौंदर्याचा बाज बेंगाली; पण अंदाज अस्सल भारतीय. प्रमाणबद्ध शरीरयष्टी आणि मादक अदाकारी; ओठाने आपलाच ओठ चावण्याची आणि समोरच्याच्या हृदयात प्रेमाग्नी भडकावण्याची क्षमता असलेली बिपाशा बसु तुम्ही कधीच विसरु शकत नाही. जरा आठवा, वर्ष 2002 चा राज़’. त्यामधली संजना धनराज. प्रेमासाठी आसुसलेली आणि हरवलेले प्रेम शोधण्यासाठी उटीमध्ये पोहोचलेली संजना केवळ संस्मरणीय.

रेस’मधली दोन सावत्र भावांशी डबल गेम खेळणारी सुपरमॉडेल सोनिया आणि मधुर भांडारकरच्या कॉर्पोरेटमधली उद्योजक निशिगंधा दासगुप्ता आणि ओंकारा’मधली बिल्लू चमनबहार अशा भूमिका पाहिल्या की बिपाशाच्या निर्व्याज हास्यामागे नक्की काय दडलं असेल, याचा कधीच अंदाज येत नाही, हे खरं. तिचं असणं आणि वावरणं हे एखाद्या छबिन्यासारखंच. प्रत्येकाला तिच्या एका तरी दृष्टीक्षेपाची प्रतूक्षा असतेच… पण साकीबाला’ पाहणार कुणाकडे? काहीच सांगता येत नाही, ती बिपाशा.


प्रियंका चोप्रा 

शामिल नहीं हैं जिसमें तेरी मुस्कुराहटें
वो िंज़दगी किसी भी जहन्नम से कम नहीं

सध्याच्या काळात बॉलीवूडपेक्षा हॉलीवुड आणि तिथल्या वेबसिरीज-सिनेमामध्ये आपलं बस्तान बसवलेली पीसी’ अर्थात पिचकू’ म्हणजे प्रियंका चोप्रा. कुठे ऐतराज’मध्ये पुरुषसुखाला वखवखलेली सोनिया, तर कुठे मस्तानी’शी विवाह केलेल्या आपल्याच नवऱ्यावर बाजीराव पेशव्यावर निस्सीम प्रेम करणारी काशीबाई; कुठे फॅशन’मधली करिअरिस्ट मेघना माथूर तर कुठे डॉन’मधली अंडरवर्ल्ड शार्पशूटर रोमा, प्रियंकानं तिच्या सगळ्याच भूमिका संस्मरणीय केल्या. अतिशय आदर्शवत भारतीय सौंदर्य असं जिचं सार्थ वर्णन केलं जाऊ शकतं, ती प्रियंका तिच्या मधुर आणि खट्याळ हास्यमुद्रांसाठी विशेषच प्रसिद्ध आहे.

गुंडे’मधली नंदीनी सेनगुप्ता आणि सुमरमॉम बनलेली बॉक्‍सर मेरी कोम’. प्रियंकानं कोणतीही भूमिका साकारताना आपल्या चेहऱ्यावरचं निरागस हास्य कधीच मावळू दिलं नाही. निकी जोनाज़शी विवाह करुन एनआरआय बनलेल्या प्रियंकानं तिथेही आपली कमाल सुरुच ठेवली आहे. आगामी मॅट्‍रिक्‍स-4’मध्ये तिचं एक वेगळंच रुप आपल्याला पहायलं मिळणार आहे. त्यामुळं प्रियंकाविना हिंदी सिनेसृष्टी ही जहन्नम’ बनली नसली तरच नवल.


ऐश्‍वर्या राय 

ज़रा इक तबस्सुम की तकलीफ़ करना कि गुलज़ार में फूल मुरझा रहे हैं  हिच्याबद्दल काय बोलायचं? काही बोलूच शकत नाही आपण. हे जग सोडून जाताना मी माझे डोळे कुणाला तरी देऊन जाईन…’ असं उत्तर देताच जिच्या चेहऱ्यावर आनंद आणि हिरव्या-हिरव्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले, ती ऐश्‍वर्यसंपन्न ऐश्‍वर्या म्हणजे समृद्ध जीवनाचा साक्षात्कारच. स्वत:चं हवेलीएवढं घर आणि देवदासची खरेखुरी हवेली यांत बेलामूम धुडगुस घालणारी शरदचंद्र चट्टोपाध्यायांची पारो’ अर्थात पार्वतीला कोण विसरेल? 

देवदासवर उम्मीद-से-ज्यादा प्रेम करणारी पारो भारतीय सिनेमांतील एक अजरामर अशीच व्यक्तिरेखा आहे. ताल’मधली पहाडन नर्तकी-गायिका मानसी शंकर, धुम’मधली सुन्हेरी असो किंवा संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके सनम’मधली नंदीनी दरबार; रेनकोट’मधली नीरजा असो की शब्द’मधली अंतरा वसिष्ठ, ऐश्‍वर्या राय-बच्चनने तिचं मनमोहक हास्य उधळलं नाही, असा सिनेमाच विरळा. 

अगदी आ अब लौट चलें’सारखा भारतीय मूल्यांवर प्रकाश टाकणारा सिनेमा असो की जोधा अकरबर’मधली राजपुताना जोधा, ऐश्‍वर्याने आपलं अस्तित्त्व रुपेरी पडद्यावर कायमसाठी निर्माण केलंच; शिवाय काळालाही बजावून सांगितलं की, ऐश्‍वर्याला वळसा घालून हिंदी सिनेमाचा इतिहास लिहिता येणार नाही.


क्रिती सेनन

फूल बनकर मुस्कुराना जिंदगी हैं
मुस्कुरा के ग़म भुलाना जिंदगी हैं

इथं लिहिलेल्या शेराप्रमाणेच आपल्या जीवनातही आपलं दु:ख विसरून प्रत्येक सिनेरसिकाला त्या दु:खाचा विसर पाडायली लावणारी ऍक्‍ट्रेस म्हणजे क्रिती सेनन. आधी इंजिनिअरिंग करत आयटीमधलं करिअर आणि मग मॉडेलिंगमार्गे रजतपटावर झळकलेली क्रिती सेननचं हास्य मधुर हास्यामध्येच जमा होतं.

नव्या जमानाच्या पिढीला आपलीशी वाटणारी टॉम-बॉईश क्रिती सेनन म्हणजे फूल बनकर मुस्कुराना जिंदगी हैं… चा प्रत्ययच. हिरोपंती’मधली डिम्पी आणि दिलवाले’मधली इशिता मलिक या विरोधी भूमिकांही तिने सार्थपणे पेलल्या. तर राब्ता’मधली सायरा सिंग आणि लुकाछिपी’मधली रश्‍मी त्रिवेदी साकारणाऱ्या क्रिती सेनननेच ऐतिहासिक मेगामुव्ही पानिपत’मधली पार्वतीबाई साकारली आहे.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.