नवी दिल्ली – गेल्या 2 महिन्यांमध्ये केंद्र सरकारने सिलिंडरच्य दरात वाढ केली होती. आता पुन्हा सलग तिसऱ्या महिन्यात सिलिंडरच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तेल विपणन कंपन्यांनी सलग तिसऱ्या महिन्यात एलपीजीच्या किंमतीत वाढ केली आहे.
इंडियन ऑईल कॉर्पोरेशननुसार विना अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ७७ रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता मुंबईत १४.२ किलोच्या सिलिंडरसाठी ६५१ रूपये मोजावे लागणार आहेत.
दरम्यान, दुसरीकडे व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या (१९ किलो) दरातही मोठी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये ११९ रूपयांची वाढ करण्यात आली असून आता दिल्लीत १९ किलोच्या सिलिंडरसाठी दिल्लीत १ हजार २०४ रूपये मोजावे लागणार आहेत.
ऑक्टोबर महिन्यात १९ किलोच्या सिलिंडरसाठी १ हजार ८५ रूपये मोजावे लागत होते. याव्यतिरिक्त पाच किलोच्या सिलिंडरच्या दरातही लाढ करण्यात आली असून ते आता २६४.५० रूपयांना मिळणार आहे. आजपासूनच हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.