fbpx

“थप्पड’, “छपाक’ आणि “शुभमंगल ज्यादा सावधान’ला नामांकन

थप्पड, “छपाक’ आणि “शुभमंगल ज्यादा सावधान’ या सिनेमांना ऑस्ट्रेलियन ऍकेडमी ऑफ सिनेमा ऍन्ड टॅलिव्हिजन आर्टस ऍवॉर्डससाठी नामांकन मिळाले आहे. या तिन्ही सिनेमांना “बेस्ट एशियन फिल्म’ श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे. हे तिन्ही सिनेमे वेगवेगळ्या सामाजिक समस्यांशी संबंधित आहेत. या समस्यांचे निराकरण करून समाजामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणे गरजेचे आहे, हा संदेश या सिनेमांमधून दिला गेला आहे.

“एनएसडब्लू गव्हर्नमेंट’च्यावतीने या पुरस्कारांना सहाय्य दिले गेले आहे. यापूर्वी “दंगल’ला “बेस्ट एशियन फिल्म ऍवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले होते. नामांकन मिळालेल्या सिनेमांपैकी अनुभव सिन्हाचा “थप्पड’ हा कौटुंबिक हिंसेच्या विषयावर बेतलेला आहे. तर मेघना गुलजारचा “छपाक’ हा महिलांवरील ऍसिड हल्ल्याच्या समस्येवरील सिनेमा आहे.

हितेश कैवल्य आणि रोहित शर्माचा “शुभ मंगल ज्यादा सावधान’ हा होमोसेक्‍सुऍलिटी आणि समलिंगी प्रेमाच्या विषयावर भाष्य करतो. यापैकी “थप्पड’ आणि “छपाक’ हे दोन्ही सिनेमांचे विषय अतिशय गंभीर पद्धतीने हाताळण्यात आले आहेत, तर “शुभ मंगल ज्यादा सावधान’ विनोदी आणि प्रहसनाच्या पद्धतीने हाताळला गेलेला सिनेमा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.