उमेदवारी मागितल्याने नेत्यांना पोटशूळ : गुंड 

रोहित पवार आम्हाला टाळून मेळावे घेतात; उमेदवारीसाठी संघर्ष करणार

मोठ्याचा आला गाडा अन्‌…

मोठ्याचा आला गाडा अन्‌ गरिबाच्या झोपड्या मोडा, अशी स्थिती मतदारसंघात झाली आहे. मात्र मंजुषाताई गुंड यांची उमेदवारी काटली तर आमचा निर्णय ठरलाय. काका, तुम्ही पक्षाचे काम करा. आम्ही पक्षाशी एकनिष्ठ राहण्याशी बांधील नाही अशी भूमिका कार्यकर्ते मोहन घालमे यांनी मेळाव्यात मांडली.

कर्जत – आम्ही कार्यकर्त्यांच्या ओळखी करून दिल्या, नावे दिली, फोन नंबर दिले. मात्र रोहित पवारांनी आमच्या तालुक्‍यात, जिल्हा परिषद गटात येऊन आम्हाला टाळून कार्यकर्ता मेळावे घेतले याचे दुःख झाले. आम्ही पक्षाकडे उमेदवारी मागितल्याने तालुक्‍यातील काही नेत्यांना पोटशूळ उठला. आम्ही उमेदवारीसाठी शेवटपर्यंत संघर्ष करणार आहोत. सर्व जिल्हा परिषद गटांमध्ये कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन कार्यकर्ते ठरवतील तसा पुढचा निर्णय घेऊ असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र गुंड यांनी दिला.

कुळधरण येथे आयोजित कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मुबारक मोगल होते.प्रास्ताविकात महेंद्र गुंड यांनी पालकमंत्र्यांना अनेकदा चारीमुंड्या चीतपट करणारा हा गट असल्याचे सांगत 40 वर्षांच्या राजकीय अनुभवाने विधानसभा निश्‍चित जिंकू असा निर्धार व्यक्त केला. यावेळी डॉ.चमस थोरात, अरुण लामटुळे, डॉ. संदीप बोराटे, शिवाजी सुद्रिक, मधुकर घालमे, बाळासाहेब थोरात, मोहन घालमे, लहू वतारे आदींची भाषणे झाली. सूत्रसंचलन शरद जगताप यांनी केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×