लखनौ – परस्पर संमतीने एकत्र राहणाऱ्या जोडप्याने इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना नोएडातील गौतम बुद्ध नगरच्या बिसरख परिसरात सिटी सोसायटीत शुक्रवारी दुपारी चार वाजता घडली. अजय कुमार (वय 28, विजयनगर, गाझियाबाद), प्राची कुमारी (वय 28, गाझियाबाद) असे आत्महत्या केलेल्या दोघांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले. तपासादरम्यान दोघेही परस्पर संमतीने राहत असल्याचे पोलिसांना समजले.
या घटनेची माहिती पोलिसांनी दोघांच्या कुटुंबीयांना दिली आहे. पोलिस आयुक्त आलोक सिंह यांचे मीडिया प्रभारी पंकज कुमार यांनी सांगितले की, शुक्रवारी संध्याकाळी बिसरख पोलिस स्टेशनला या घटनेची माहिती मिळाली की, गौर सिटी सोसायटीतील एका इमारतीच्या 21 व्या मजल्यावरून दोघांनी उडी मारली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि दोघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले. त्यांनी सांगितले की तपासादरम्यान पोलिसांना कळले की दोघेही परस्पर संमतीने एकत्र राहत होते. या घटनेची माहिती तरुण आणि तरुणीच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.
याप्रकरणी कुटुंबीयांनी काही तक्रार केल्यास पोलिस पुढील कारवाई करतील, असे पंकज यांनी सांगितले. दोघांनी कोणतीही सुसाइड नोट सोडली नसल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्या करण्यापूर्वी दोघांनी आपल्या फ्लॅटचे कुलूप आतून लावले होते.