कोणाकडेही सत्तेचे अमरत्व नाही – डॉ. अमोल कोल्हे

अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी घेतली सभा

न्हावरे – कोणीही सत्तेचे अमरत्व घेऊन आलेले नाही. सत्तेची मस्ती आलेल्या सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या, अशी टीका शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली.

शिरूर येथील जुन्या मार्केट यार्ड परिसरात राष्ट्रवादीचे शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे अधिकृत उमेदवार ऍड. अशोक पवार यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अगोदर झालेल्या सभेत खासदार डॉ. कोल्हे बोलत होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष वैशाली नागवडे, राष्ट्रवादीचे शिरूर तालुक अध्यक्ष रवी काळे, हवेली तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारिवाल यांचे पुत्र आदित्य धारिवाल, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख पदाधिकारी, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, सत्ताधारी हे शेतकरी, कष्टकरी, नोकरदार यांच्या विरोधात आहेत. त्यामुळे सरकारच्या सूडबुद्धीला सामान्य जनता त्यांच्यात भाषेत उत्तर देईल. तसेच सध्याच्या भाजपा शासनाने फक्‍त फोडाफोडीचे राजकारण केले आहे. त्यांना जनतेचे काहीही घेणे-देणे नाही, असे त्यांनी नमूद केले.

Leave A Reply

Your email address will not be published.