नवी दिल्ली : वैद्यकीय संशोधनासाठीचा जगातील सर्वाधिक मानाचा नोबल पुरस्कार विल्यम केलीन (ज्यनियर), सर पिटर जे. रॅटक्लिफ आणि जॉर्ज एल सेमेन्झा यांना घोषीत करण्यात आला आहे. उपलब्ध ऑक्सिजनमधून पेशी तो कसा मिळवतात, याबाबत त्यांनी केलेल्या संशोधनाचा सन्मान करण्यात आला. ऑक्सीजनच्या पातळीला प्रतिसाद देताना ती नियमित करण्यातील गुणसुत्रांचे कार्य त्यांनी सिध्द केले.